अंगणवाडी सेविका डिजिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:50 PM2019-04-10T21:50:02+5:302019-04-10T21:57:04+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३६० अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका आता डिजिटल झाल्या असून, त्यांचा संपूर्ण कारभार पेपरलेस झाला आहे. कुपोषणमुक्ती, महिला आणि युवतींचे आरोग्य, बालकांना पोषण आहार आदींची माहिती काही क्षणात सर्व्हरवर पाठविण्यात येणार आहे.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३६० अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका आता डिजिटल झाल्या असून, त्यांचा संपूर्ण कारभार पेपरलेस झाला आहे. कुपोषणमुक्ती, महिला आणि युवतींचे आरोग्य, बालकांना पोषण आहार आदींची माहिती काही क्षणात सर्व्हरवर पाठविण्यात येणार आहे.
केंद्रीय महिला बालविकास मंत्रालयाच्या पोषण अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्याची निवड पायलट प्रोजेक्टसाठी करण्यात आली आहे. त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील ३६० अंगणवाडी सेविकांना डिजिटलचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्र माचा शुभारंभ करण्यात आला.
महिला आणि बालविकास विभागाकडून प्रत्येक अंगणवाडी सेविकेला अत्याधुनिक मोबाइल संच वितरित करण्यात आला. त्यासोबत अंगणवाडी केंद्रात ज्या मोबाइल कंपनीला नेटवर्कआहे त्या कंपनीचे सिमकार्ड, सहा महिन्यांचे रिचार्ज करण्याची रक्कम आणि मेमरीकार्डसुद्धा देण्यात आले आहे. या मोबाइलमध्ये विशेष सॉफ्टवेअर असून, अंगणवाडी केंद्रातील दहा प्रकारचे रजिस्टर आॅनलाइन स्वरूपात भरता येणार आहेत.
इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य प्रशिक्षक आणि समन्वयक म्हणून बालविकास प्रकल्पाधिकारी वंदना सोनवणे, पर्यवेक्षक ज्योती काळे, अलका खांदवे, सविता लोहरे, मंदा गायकवाड, सुखदा पाराशरे, मंगला झडे, चित्रा कुलट, पूर्वा दातरंगे, चंद्रकला साबळे, संध्या देशमुख, फरझाना नाईकवाडी यांच्याकडून कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला आहे. शुभारंभप्रसंगी डॉ. प्रदीप कागणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.आधुनिकतेची कास धरून आम्हाला डिजिटल करण्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण देण्यात येत आहे. या माध्यमातून दहा प्रकारचे रजिस्टर भरण्यात वाया जाणारा वेळ वाचणार आहे. याचा उपयोग अंगणवाडी केंद्राला देऊन वेळेचा सदुपयोग होईल.
- संजीवनी वाघमारे, अंगणवाडी सेविका, पिंप्री सदो
तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका प्रशिक्षित करून पारदर्शक कामकाज करण्यासाठी काम सुरू आहे. १ मे या दिवशी संपूर्ण अंगणवाडी केंद्र आणि सेविका डिजिटल होऊन आॅनलाइन आणि पेपरलेस कारभार सुरू होईल. यासाठी अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या आहेत.
- किरण जाधव, गटविकास अधिकारी, इगतपुरी