वंचित विद्यार्थ्यांसाठी अंगणवाड्यांचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:20+5:302021-09-27T04:15:20+5:30
जिल्हा परिषद शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ...
जिल्हा परिषद शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले, कोरोनाकाळात शासनाने मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. ज्यावेळी समाज अधिक शिक्षित होईल त्यावेळी विविध प्रश्न आपोआप मार्गी लागतील. ज्ञान ही संपत्ती असून, शिक्षक हे ज्ञानदाते आहेत हे लक्षात घेऊन कार्य करावे. शासन शिक्षकांच्या सोबत असून, त्यांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ग्रामीण भागातील शाळांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री भुजबळ यांनी यावेळी दिले. यावेळी संस्थेचे राज्य अध्यक्ष संभाजीराव थोरात, ॲड. रवींद्र पगार, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजय शेवाळे यांनी केले. याप्रसंगी उपमहापौर नीलेश आहेर, अंबादास वाजे, ॲड. रवींद्र पगार, संदीप पवार संस्थेचे अध्यक्ष संजय शेवाळे, मानद सचिव कैलास पगार, गटशिक्षण अधिकारी तानाजी भुगडे, विनोद शेलार आदी उपस्थित होते.
इन्फो
प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : झिरवाळ
जिल्हा परिषद शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देताना ग्रामीण भागातील शाळांच्या मूलभूत सुविधांवर संस्थेने लक्ष केंद्रित करून भर देण्याचे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून, आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. कोरोनाकाळात निधन झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना संस्थेच्या तसेच संघटनेच्या वतीने मदत करून मार्गदर्शन करावे, असे आवाहन झिरवाळ यांनी केले.
फोटो - २६ मालेगाव भुजबळ
मालेगाव येथे कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राजेंद्र भोसले, संभाजीराव थोरात, रवींद्र पगार आदी.