कोरोना जागृती प्रतिबंधासाठी लढलेल्या अंगणवाडी सेविकेचा कोरोनामुळेच मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 06:03 PM2020-08-16T18:03:30+5:302020-08-16T18:05:26+5:30
सायखेडा : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळापासुन आपल्या नित्य कामकाजात कोणताही खंड न पाडता जनजागृती कोरोना प्रतिबंधासाठी रानोमाळ हिंडणाऱ्या कर्तव्यतत्पर अंगणवाडी सेविकेचा कोरोनामुळेच मृत्यु झाल्याने निफाड तालुक्यातील खेरवाडी गाव हळहळले आहे.
सायखेडा : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळापासुन आपल्या नित्य कामकाजात कोणताही खंड न पाडता जनजागृती कोरोना प्रतिबंधासाठी रानोमाळ हिंडणाऱ्या कर्तव्यतत्पर अंगणवाडी सेविकेचा कोरोनामुळेच मृत्यु झाल्याने निफाड तालुक्यातील खेरवाडी गाव हळहळले आहे.
अलका केशव संगमनेरे (५१) यांनी सतरा वर्षापुर्वी अंगणवाडी सेविका म्हणुन सेवेस सुरु वात केली. कुटुंबीयांना हातभार लावत आपले कर्तव्यदेखील इमाने इतबारे करण्यात त्यांची ख्याती होती. कोरोना काळात गेल्या काही महीन्यापासून शासनाच्या आदेशाने करोना परिस्थिती सांभाळण्यासाठी डॉक्टरासमवेत आपल्या आरोग्याची पर्वा न करता गावाची सेवा करत होत्या. दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत रानोमाळ हिंडत सामान्य जनतेला कोरोनाबाबत प्रबोधन अन प्रतिबंधासाठी अर्सेनिक अल्बम गोळ्या वितरण तसेच रु ग्णांचे सर्वेक्षण अशी दिलेली प्रत्येक जबाबदारी संगमनेरे यांनी पेलली होती. जनतेच्या आरोग्यासाठी अविरत लडणाºया अंगणवाडी सेविकेचा दहा तारखेला कोरोना पॉझीटिव्ह अहवाल आला अन उपचारादरम्यान त्यांचा तेरा आॅगस्टला मृत्यु झाला.
दरम्यान खेरवाडी तालुका निफाड येथे आणखी काही अंगणवाडी सेविकांना कारोनाची लागण झाल्याचे समजते गेल्या मार्च महिन्यापासून निफाड तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा तसेच सरकारी दवाखान्यातील कर्मचारी कारोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक गावातील वाडी, वस्ती पिंजून काढत आहे. गावाच्या वेशीवरच कोरोनाला रोखण्यासाठी प्राप्त परिस्थिती ती झगडा देत आहे. कोरोनाशी दोन हात करताना मृत्यू झालेल्या अलका संगमनेर त्यांचे पश्चात पती, दिर असा परिवार आहे.
(फोटो १६ अलका संगमनेरे)