इंग्रजीसाठी अंगणवाडी सेविकांना घ्यावी लागते इतरांची मदत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:16+5:302021-07-31T04:15:16+5:30

-------- मोबाईलची अडचण वेगळी मोबाईलवरच अंगणवाडी सेविकांचे ऑनलाईन काम केले जात असले तरी, बऱ्याच वेळा गावातील खंडित वीजपुरवठ्याचा त्रास ...

Anganwadi workers have to take help of others for English! | इंग्रजीसाठी अंगणवाडी सेविकांना घ्यावी लागते इतरांची मदत !

इंग्रजीसाठी अंगणवाडी सेविकांना घ्यावी लागते इतरांची मदत !

Next

--------

मोबाईलची अडचण वेगळी

मोबाईलवरच अंगणवाडी सेविकांचे ऑनलाईन काम केले जात असले तरी, बऱ्याच वेळा गावातील खंडित वीजपुरवठ्याचा त्रास त्यांना सोसावा लागतो. वीजपुरवठा नसल्यास मोबाईल टॉवर बंद पडतो, तसेच मोबाईल चार्जिंग करणेही अवघड होऊन बसते, अशा वेळी नियमित माहिती पाठविण्यात अडचणी येतात.

-------

कामकाजात सुसूत्रता

एकात्मिक बाल विकास विभागाने प्रत्येक अंगणवाडी सेविकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडल्यामुळे कामकाजात गतिमानता तसेच सुसूत्रता व अचूकता आली आहे. थेट राज्यापर्यंत गावाची माहिती पोहोचू लागली आहे.

-दीपक चाटे, महिला बालकल्याण अधिकारी

-------------------------------

पोषण ट्रॅकवरील कामे

गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवणे, गावातील शून्य ते दोन व दोन ते सहा वयोगटातील बालकांची नोंदणी करणे, या बालकांचे दरमहा वजन घेणे, कुपोषित, मध्यम, तीव्र गटात त्यांचे वर्गीकरण करणे. गावातील गरोदर महिलांची माहिती संकलित करून त्यांना तिसऱ्या महिन्यापासूनच देखरेखीखाली ठेवणे, स्तनदा महिलांना पोषण आहार देणे. कुपोषित बालकांना पोषण आहार पुरविणे, त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करणे. पोषण आहाराच्या नोंदी ठेवणे, लाभार्थी निश्चित करणे व आहार वाटपावर नियंत्रण ठेवणे.

---------------

आम्हाला इंग्रजी कशी येईल?

एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाने अंगणवाडी सेविकांना ‘पोषण ट्रॅक’ या अ‍ॅपवर माहिती भरण्यास सांगितली आहे. इंग्रजीत सारी माहिती असल्याने माझ्यासारख्या इंग्रजी फारशी न शिकलेल्या सेविकांची अडचण होते. अशावेळी शिक्षित सहकारी सेविकांची मदत घ्यावी लागते. सर्व माहिती गोळा करून आणल्यानंतर त्यांच्याकरवी भरून घेतली जाते.

- एक सेविका

----------

ग्रामीण भागात भ्रमणध्वनीच्या अनेक तक्रारी आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तर मोबाईलला रेंज मिळत नाही. वीजपुरवठा खंडित होत असल्याने चार्जिंगचाही प्रश्न असतो. अशात इंग्रजीत माहिती भरायची म्हटल्यावर काहीशी अडचण येते. बऱ्याच वेळा एकमेकांच्या मदतीने काम केले जाते. तर, कुटुंबातील शिक्षित व्यक्तीचीही मदत घेतली जाते.

- एक सेविका

--------------

जिल्ह्यातील अंगणवाड्या- ४७७६

एकूण अंगणवाडी सेविका- ८८७३

Web Title: Anganwadi workers have to take help of others for English!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.