पिंपळगावी अंगणवाडी सेविकांनी पिकविला सेंद्रिय भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 06:51 PM2021-01-21T18:51:10+5:302021-01-21T18:51:36+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील ग्रामपालिकेच्या अभिनव उपक्रमातून शहरात ह्यमाझी वसुंधरा अभियानह्ण राबविण्यात येत असून त्या अंगणवाडीच्या आवारात सेविकांकडून विविध प्रकारचा विषमुक्त, सेंद्रिय भाजीपाला पिकविला जात आहे. त्यामुळे संतुलित पर्यावरण राखण्यासाठी मदत होणार आहे.

Anganwadi workers in Pimpalgaon cooked organic vegetables | पिंपळगावी अंगणवाडी सेविकांनी पिकविला सेंद्रिय भाजीपाला

पिंपळगावी अंगणवाडी सेविकांनी पिकविला सेंद्रिय भाजीपाला

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतीतर्फे वसुंधरा अभियान, संतुलित पर्यावरण राखण्यासाठी पुढाकार

पिंपळगाव बसवंत : येथील ग्रामपालिकेच्या अभिनव उपक्रमातून शहरात ह्यमाझी वसुंधरा अभियानह्ण राबविण्यात येत असून त्या अंगणवाडीच्या आवारात सेविकांकडून विविध प्रकारचा विषमुक्त, सेंद्रिय भाजीपाला पिकविला जात आहे. त्यामुळे संतुलित पर्यावरण राखण्यासाठी मदत होणार आहे.
पिंपळगाव ग्रामपालिकेने ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानाअंतर्गत शहरातील अंगणवाडी आवारात पालक, शेपू, कोथिंबीर, कांदापात, मेथी, फ्लॉवर आदी सेंद्रिययुक्त पालेभाज्यांच्या रोपांची लागवड केली होती. नागरिकांना वृक्ष लागवडीचे महत्त्व तसेच नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा (सेंद्रिय भाजीपाला) उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अंगणवाडी सेविका उज्ज्वला कागदे यांच्याकडून भाजीपाला रोपावर नियमित सेंद्रिय पद्धतीच्या औषधांची फवारणी करून निगराणी राखली जात असल्याने विशेष म्हणजे या रोपांचे भाजीपाल्यात रूपांतर झाल्याने ताजा विषमुक्त भाजीपाला तयारदेखील झाला. अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून तयार झालेला भाजीपाला गोरगरीब नागरिकांना मोफत वाटप करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद दिसून आला.

शहरात ठिकठिकाणी उद्यान गार्डन उभारण्यात आले असून स्मार्ट शहर म्हणून पिंपळगावची ओळख हळूहळू होत आहे. त्यासाठी निसर्गासोबत वसुंधरा अभियानअंतर्गत मैत्री करून शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे. त्यात झाडे लावा, निसर्ग वाचवा, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, निरोगी जीवन, त्यासाठी असलेली नियमित स्वछता ठेवा, असे आवाहन देखील नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत आहे.
-गणेश बनकर, ग्रामपालिका सदस्य, पिंपळगाव

विषमुक्त आहार नक्की मिळणार
शहरातील संपूर्ण अंगणवाडी परिसरात परसबागा उभारून विषमुक्त भाजीपाला तयार करण्यात येत आहे. अंगणवाड्या सुरू झाल्यावर नक्कीच त्याचा फायदा शाळेतील बालकांना होणार असून विषमुक्त आहार मिळणार आहे. त्यामुळे इतर ग्रामपालिकांनीही या अभिनय उपक्रमांची दखल घेऊन ही मोहीम राबविणे गरजेचे आहे.

पिंपळगाव शहरातील अंगणवाडी परिसरात उभारलेल्या परसबागांमध्ये काम करताना सेविका. (२१ पिंपळगाव १)

Web Title: Anganwadi workers in Pimpalgaon cooked organic vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.