अंगणवाड्यांना गावातच मिळणार आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:28 PM2019-08-20T23:28:56+5:302019-08-21T01:03:24+5:30
गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांना ‘रिंग’ करून पोषण आहार पुरविणाºया ठेकेदारांना सर्वाेच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर राज्य सरकारने आता गाव पातळीवरील महिला बचत गटांना अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्याचा ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांना ‘रिंग’ करून पोषण आहार पुरविणाºया ठेकेदारांना सर्वाेच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर राज्य सरकारने आता गाव पातळीवरील महिला बचत गटांना अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्याचा ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या हातांना काम मिळण्यास मदत होणार असून, जिल्ह्णातील अंगणवाड्यांसाठी १० सप्टेंबरपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.
महिला व बालविकास खात्यांतर्गत येणाºया स्तनदा माता, कुपोषित बालकांच्या उत्थानासाठी शासनाने १९८४ पासून एकात्मिक बालविकास प्रकल्प सुरू केले असून, त्याद्वारे सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके, स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार देण्याचे तर तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडीत ताजा पोषण आहार पुरविला जात आहे. त्यासाठी राज्यपातळीवरून एकात्मिक बालविकास प्रकल्प आयुक्तांमार्फत पोषण आहार पुरविण्यासाठी ठेका देण्यासाठी निविदा मागविल्या
जात. गेल्या अनेक वर्षांपासून पोषण आहार पुरविण्याच्या नावाखाली गैरप्रकार करणाºया ठेकेदारांनी शासनाच्या या योजनेतून स्वत:चे चांगभलं करून घेतले. त्यासाठी ठेकेदारांनीच राज्य पातळीवर ‘रिंग’ करून वर्षानुवर्षे ठेका आपल्याकडे ठेवला.
परिणामी या योजनेतून शासनाचा मुख्य हेतू सफल होऊ शकला नसला तरी, ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी, राज्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात पोषण झाले. या संदर्भातील तक्रारी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर न्यायालयाने गावपातळीवरूनच पोषण आहार पुरविण्याचे आदेश शासनाला दिले व त्यानुसार या योजनेतील ‘ठेकेदारी’ बंद करण्याचे पाऊल उचलले गेले. या बचत गटांकडे यापूर्वी पोषण आहार पुरविण्याचा अनुभव, पोषण आहार शिजविण्यासाठीची उपकरणे, स्वत:ची जागा, किमान ९० महिने पोषण आहार साठविण्यासाठी गुदाम, त्यातील स्वच्छता अशा सुमारे ७७ अटी-शर्ती घालण्यात आल्या असून, एका बचत गटाला पाच अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्याचे काम दिले जाणार आहे. त्यासाठी मात्र त्यांना आॅनलाइन निविदा भरावी लागणार आहे.
जिल्ह्णात ५२४८ अंगणवाड्यांना लाभ
शासनाने महिला बचत गटांना पोषण आहार पुरविण्याचा ठेका देण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्णातील महिला बचत गटातील महिलांच्या हाताला काम व रोजगाराची निर्मिती होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्णात ४७७६ मोठ्या अंगणवाड्या असून, ५०२ मिनी अंगणवाड्या आहेत. त्यातील तीन लाख ८५ हजार ३५९ बालकांना ताजा व पोषण आहार यामुळे स्थानिक पातळीवरच मिळणार आहे.
प्रत्येक जिल्ह्णात आता ग्रामपंचायत पातळीवर महिला बचत गटांना पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या आहारात बालके व स्तनदा मातांसाठी घरपोच पोषण आहार तर अंगणवाडीतील बालकांना ताजा पोषण आहार असे दोन प्रकारचे पोषण आहार पुरविण्यासाठी बचत गटांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.