ऐरणीच्या देवा तुला...
By admin | Published: December 9, 2015 10:58 PM2015-12-09T22:58:48+5:302015-12-09T23:00:08+5:30
ऐरणीच्या देवा तुला...
मनमाड : शेतीच्या यांत्रीकीकरणामुळे ‘त्यांच्या’ नशीबी भटकंतीशेती व्यवसायात मशागतीसाठी कोयता, कुुऱ्हाड, कुदळ,विळे, दाते,पास या औजारांची शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गरज भासते.या औजारांची निर्मिती करण्यामधे लोहार व घिसाडी या लोकांचा मोठा सहभाग असतो. धगधगत्या भट्टी मधे लालजर्द तापलेल्या लोखंडाला आकार देण्याचे काम या कारागिरांकडून करण्यात येते.सध्या मनमाड येथील निमोण चौफुली परिसरात शेती औजारे तयार करणाऱ्या जवळपास पन्नास लोकांचा ताफा दिवसभर लोखंडाला आकार देत औजारे तयार करत असल्याचे दिसून येते. ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची ही औजारे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी गर्दी होत आहे.
मध्यप्रदेशातील दोराना तालुका: राघोगड, जि: गुना येथील या कारागीरांवर पोटासाठी राज्याबाहेर जाण्याची वेळ आली आहे. शेतीचे झालेले यांत्रीकीकरण व पावसाचे अल्पप्रमाण या कारागिरांच्या रोजगाराच्या मुळावर ठरले आहे.
ट्रॅक्टर ने नांगरणी , खुरपणी व अन्य कामे होत असल्याने बैलजोडी शेती व्यवसायातून हद्दपार झाली त्या बरोबरच नांगर, वखर, कोळपे, पास ही औजारे ही लयास गेली. पिढ्यान पिढ्या ही औजारे तयार करणाऱ्या कारागिरांना त्याचा फटका बसला आहे.