महिलांकडून नाराजी : दरवाढीमुळे सौंदर्यप्रसाधन विक्रेते, व्यावसायिकही संभ्रमात ब्यूटिपार्लरच्या सेवेलाही बसला महागाईचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:50 AM2018-04-02T00:50:01+5:302018-04-02T00:50:01+5:30

नाशिक : केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार यात महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ब्यूटिपार्लरला महागाईचा फटका बसणार आहे.

Anger: Women's clothing sells because of the price hike, and the businessman also suffers from a fall in inflation. | महिलांकडून नाराजी : दरवाढीमुळे सौंदर्यप्रसाधन विक्रेते, व्यावसायिकही संभ्रमात ब्यूटिपार्लरच्या सेवेलाही बसला महागाईचा फटका

महिलांकडून नाराजी : दरवाढीमुळे सौंदर्यप्रसाधन विक्रेते, व्यावसायिकही संभ्रमात ब्यूटिपार्लरच्या सेवेलाही बसला महागाईचा फटका

Next

नाशिक : केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार यात महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ब्यूटिपार्लरला महागाईचा फटका बसणार आहे. सौंदर्य प्रसाधने महागल्याने सौंदर्य सेवा देणे कठीण झाले असून, दरात पार्लरमधील ट्रिटमेंटमध्ये सातत्याने दरवाढ करावी लागत असल्याने सौंदर्यतज्ज्ञ, विक्रेते यांना ग्राहकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे, तर महागाईमुळे आवश्यक ट्रिटमेंटलाच प्राधान्य देत इतर ट्रिटमेंट टाळण्यावर महिला भर देत असल्याचे दिसून येत आहे.
मोठ्या व ब्रॅँडेड कंपन्या सौंदर्य प्रसाधनांवर पूर्वी छोट्या मोठ्या फ्री गिफ्टस वा अन्य सवलतीही देऊ करत होत्या. आता फ्री गिफ्टवरही जीएसटी बसला असल्याने त्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे सौंदर्य प्रसाधनांची खरेदी, लहान मोठ्या पार्लरमध्ये जाऊन सौंदर्योपचार घेण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शासनाने ही दरवाढ मागे घेत महिलांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

Web Title: Anger: Women's clothing sells because of the price hike, and the businessman also suffers from a fall in inflation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.