कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्याने नाराजी
By admin | Published: July 2, 2014 09:29 PM2014-07-02T21:29:09+5:302014-07-03T00:08:16+5:30
कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्याने नाराजी
लासलगाव : केंद्र शासनाने कांद्याचे भाव रोखण्याकरिता बुधवारी कांद्याचे किमान निर्यातमूल्य ३०० डॉलरवरून ५०० प्रतिडॉलरपर्यंत वाढविल्याने कांदा उत्पादकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, लासलगावी बुधवारी कांदा बाजारपेठेत सोमवार व मंगळवारच्या तुलनेत शंभर रुपयांनी कांदा भावात वाढ होऊन बुधवारी ९०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली.
बुधवारी लग्नसराईची तिथी जास्त असल्याने लासलगाव बाजारपेठेत कांदा आवक कमी झाली. केवळ ६५० वाहनातील कांदा बाजारपेठेत विक्रीस आलेला होता. त्यामुळे कांदा खरेदीकरिता व्यापारीवर्गात तीव्र स्पर्धा होती.
रेल्वेने मालवाहतूक दरात ६.५ टक्के दरवाढ केलेली आहे. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांना परराज्यात रेल्वेने कांदा पाठविणे महागले आहे. त्याचा सर्व भार कांदा लिलावातील भाव जाहीर होण्यावर प्रतिकूल होत आहे.
मागील यूपीए शासनाने कांद्याला भाव मिळावा म्हणून कांदा निर्यातमूल्य ० वर आणले होते. त्यामुळे कांदा निर्यातीला काही प्रमाणात चालना मिळाली होती. परंतु मोदी सरकार सत्तारूढ होताच कांद्याचे निर्यातमूल्य ० वरून कांदा भावाची पातळी वाढताच ३०० डॉलर इतकी करण्यात आली होती. परंतु शहरी भागातील कांदा भावावरून केंद्र शासनावर विरोधक तुटून पडल्याने ३०० डॉलरवरून ५०० डॉलर प्रतिटन कांद्याचे किमान निर्यातमूल्य वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. लासलगावी बुधवारी कांदा बाजारपेठेत सोमवार व मंगळवारच्या तुलनेत शंभर रुपयांनी कांदा भावात वाढ होऊन बुधवारी ९०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली. कांदा बाजारपेठेत सोमवारी १०५६ वाहनातील १६८६० क्विंटल कांद्याचा लिलाव २३८१रुपये या सर्वाधिक भावाने झाला होता.
(वार्ताहर)
मागील सप्ताहाच्या तुलनेत दररोज शंभर रुपयांनी कांदा भावात तेजी येत असुन सोमवारी व मंगळवारी किमान भाव ९०१ ते सर्वाधीक भाव २३८१ रुपये व सर्वसाधारण भाव १९३० रुपये प्रतिविंटल होते.