कामचुकार अधिकाऱ्यांबाबत नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 01:20 AM2019-09-17T01:20:39+5:302019-09-17T01:20:58+5:30
अधिकारी सांगितलेले कामे करीत नसून त्यांच्या मनमानी कारभाराबाबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, यापुढील काळात लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे न करणाºया कामचुकार अधिकाऱ्यांची यापुढील काळात गय केली जाणार नसल्याचा इशारा प्रभाग सभापती दीपक दातीर यांनी दिला.
सिडको : अधिकारी सांगितलेले कामे करीत नसून त्यांच्या मनमानी कारभाराबाबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, यापुढील काळात लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे न करणाºया कामचुकार अधिकाऱ्यांची यापुढील काळात गय केली जाणार नसल्याचा इशारा प्रभाग सभापती दीपक दातीर यांनी दिला.
सिडको प्रभागाची मासिक सभा मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी घेण्यात आली. यावेळी प्राभाग सभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी अधिकारी सांगितलेली कामे करीत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक सुवर्णा मटाले यांनी खुटवडनगर भागात रस्ते डांबरीकरणासाठी वारंवार सांगूनही अधिकारी फक्त माती टाकतात व निघून जातात यामुळे संताप व्यक्त केला. सध्या सर्वत्र साथीच्या आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ झाली असून, मोरवाडी रु ग्णालयातदेखील रु ग्ण मोठ्या प्रमाणात आहे. परंतु डॉक्टर वेळेवर नसल्याने रुग्णांना सुविधा उपलब्ध होत नसल्याचे नगरसेवक कावेरी घुगे यांनी निदर्शनास आणून दिले.
नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी उद्यान विभागाला सांगूनही साफसफाई व गवत काढले जात नाही. मात्र सध्या सुटीच्या दिवशीही कर्मचारी कामे करीत असल्याने उद्यान विभागाच्या अधिकाºयांना गुलाब फूल देऊन स्वागत करणार असून, तसेच येत्या काळात उद्याने स्वच्छ न झाल्यास बांगड्यांचा आहेर देण्यात येणार असल्याचेही साबळे यांनी यावेळी सांगितले. फाळके स्मारकलगत व्यवसाय करणाºया छोट्या व्यावसायिकांना मनपा कर्मचारी विनाकारण त्रास देत असून, या परिसराची पाहणी करून येथील भूमिपुत्रांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी नगरसेवक सुदाम डेमसे यांनी केली.
नगरसेवक प्रतिभा पवार यांनी मुख्य रस्त्यांवर अनधिकृत व्यवसाय थाटल्याने अपघात होत असल्याचे सांगत उद्यान विभाग सांगितलेली कामे करीत नसल्याने संताप व्यक्त केला. राकेश दोंदे यांनी दत्तनगर भागात घंटागाडी येत नसल्याने संपूर्ण कचरा रस्त्यावर टाकला जात असून, अतिक्र मण विभागाचे कर्मचारी अनधिकृत व्यावसायिकांकडून सर्रास हप्ते घेत असल्याचा आरोपही दोंदे यांनी केला.
नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सांगितले की स्मार्ट सिटीकडे शहर जात असताना २४ मीटरचा रस्ता १६ मीटर केला जातोय तरी झोपेत आहेत. तसेच सर्वांत जास्त लोकसंख्या आपल्या भागात असूनही मेट्रो जात नसल्याने संताप व्यक्त करीत फेरप्रस्तावाची मागणी बडगुजर यांनी केली.
सभेस नगरसेवक कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, किरण गामणे, चंद्रकांत खाडे, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड आदींसह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
औद्योगिक वसाहतीतून सर्वांत जास्त कर महापालिकेला जमा होतो. मात्र संपूर्ण रस्यांवर खड्डे पडले आहेत ते त्वरेने दुरुस्त करण्याची मागणी धनाजी लगड यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून अंबड औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची, तर काही भागातील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असताना यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत तसेच मुख्य रस्ते गेल्या पावसाळा सुरू होण्याच्या आधीच तयार करण्यात आले होते. मात्र या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे.