संतप्त शेतकऱ्याने तोडली डाळिंबबाग

By Admin | Published: May 29, 2017 12:16 AM2017-05-29T00:16:32+5:302017-05-29T00:16:51+5:30

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील दीक्षी येथील शेतकरी हेमंत अंबादास चौधरी यांनी १ जूनच्या शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी स्वमालकीची तीन एकर डाळिंबबाग तोडली.

An angry farmer broke into the pomegranate | संतप्त शेतकऱ्याने तोडली डाळिंबबाग

संतप्त शेतकऱ्याने तोडली डाळिंबबाग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील दीक्षी येथील शेतकरी हेमंत अंबादास चौधरी यांनी १ जूनच्या शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी स्वमालकीची तीन एकर डाळिंबबाग तोडली. दीक्षी येथील हेमंत चौधरी हे पदवीधर शेतकरी असून, त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती करण्यास सुरुवात केली.  सन २०१३ पासून शेतीत नवीन काही तरी करावे या उद्देशाने डाळिंबबाग लावली. सुरुवातीला तीन एकर क्षेत्रात डाळिंब लावले. शासनाच्या फळ रोपवाटिकेतून भगवा जातीची रोपे आणली; मात्र रोपे अत्यंत कमी दर्जाची व भेसळयुक्त निघाल्याने एक वर्ष वाया गेले. या भागात दहा वर्षांपासून कृषी सहायक नसल्याने स्वखर्चाने शेततळे तयार केले. यासाठी वीस लाख रु पये खर्च करून पाच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे  उभारून डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ केली.
मात्र उत्पादनावर आधारित बाजारभाव मिळत नसल्याने चौधरी चिंतातुर होते. शेतकरी व ग्राहक यांच्या भावात मोठी तफावत होती. दरवर्षी भावात होत असलेली घसरण तसेच व्यापाऱ्यांनी घेतलेला माल व ग्राहकाला विकलेल्या मालाच्या किमतीत बराच मोठा फरक होता. आजपर्यंत उत्पादनावर आधारित भाव तर मिळालाच नाही मात्र उत्पादन खर्च दरवर्षी वाढत गेला. त्यामुळे दरवर्षी तोट्यात चाललेल्या शेती व्यवसायाला वैतागून चौधरी यांनी संपात सहभागी होण्याचे ठरवले. राज्यभरातील शेतकऱ्यांनी येत्या १ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. संप काळात फक्त स्वत:पुरतेच पिकवायचे म्हणून हेमंत चौधरी यांनी तीन एकर डाळिंबबाग तोडण्याचा निर्णय घेतला.

Web Title: An angry farmer broke into the pomegranate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.