संतप्त शेतकरी उतरले रस्त्यावर

By Admin | Published: July 10, 2016 11:13 PM2016-07-10T23:13:06+5:302016-07-10T23:55:06+5:30

मनमाड : व्यापाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प

Angry farmer landed on the road | संतप्त शेतकरी उतरले रस्त्यावर

संतप्त शेतकरी उतरले रस्त्यावर

googlenewsNext

मनमाड: शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत आता व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आज
सकाळी बाजार समतिमधे भाजी विक्री साठी आनलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली.
आडत वसुलीच्या शासनाच्या निर्णया विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंद मधे भाजीपाला व्यापारी सहभागी झाले आहे. सर्वत्र रविवारी बाजार समित्या बंद रहात असल्या तरी मनमाड येथे रविवारी आठवडे बाजार असल्याने भाजीपाला मार्केट सकाळी सुरू रहाते. त्या नुसार आज शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला विक्रीसाठी बाजार समिती मधे विक्रीसाठी आनला.
बाजार समिती मधे आल्यानंतर व्यापाऱ्यांचा बंद असल्याने भाजीपाला विक्री होउ न शकल्याने शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. या मुळे बाजार समिती समोरून जाणाऱ्या मनमाड चांदवड महामार्गावरील वहातूक काही काळ ठप्प झाली होती. अखेर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी थेट आठवडे बाजारात नेण्याचा निर्णय घेतला तर काही शेतकऱ्यांना भाजीपाला परत घरी नेण्याती वेळ आली. या मुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.(वार्ताहर)

Web Title: Angry farmer landed on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.