संतप्त शेतकऱ्याने टमाटे फेकले गुरांसमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:19 AM2018-09-20T01:19:44+5:302018-09-20T01:20:17+5:30
कांद्यासह भाजीपाला पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा त्रस्त असताना आता टमाट्याला मातीमोल भाव मिळाल्याने येवला तालुक्यातील टमाटा उत्पादक शेतकºयाने लासलगाव बाजार समितीच्या आवारातच टमाटा मोकाट जनावरांना खाण्यासाठी फेकून आपला संतप्त व्यक्त केला आहे .
लासलगाव : कांद्यासह भाजीपाला पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा त्रस्त असताना आता टमाट्याला मातीमोल भाव मिळाल्याने येवला तालुक्यातील टमाटा उत्पादक शेतकºयाने लासलगाव बाजार समितीच्या आवारातच टमाटा मोकाट जनावरांना खाण्यासाठी फेकून आपला संतप्त व्यक्त केला आहे . येवला तालुक्यातील चिचोंडी येथील शेतकरी भगवान ठोंबरे हे लासलगाव बाजार समितीत टमाटा विक्र ीसाठी आले असतात ७ टमाट्याला ३० रु पये प्रती २० किलोच्या क्र ेटला भाव मिळाल्याने वाहतूक व काढणीस झालेला खर्च निघणार नाही तर लागवडीचा खर्च लांबच असल्याने संतप्त होत ठोंबरे यांनी बाजार समितीच्या आवारात मोकाट जणावारांसमोर ७ क्रेट टमाटा फेकून देत आपला संतप्त व्यक्त केला आहे . देशांतर्गत मागणीच्या तुलनेत टमाट्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने बाजार भावात घसरण होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतातून टमाटा निर्यात पाकिस्तानात स्थगित असल्याने त्याचा फटका नाशिक जिल्ह्यातील टमाटा व्यापाºयांसह उत्पादकांना बसत असल्याने बंद असलेली निर्यात पुन्हा सुरु करण्यसाठी लासलगाव बाजार समितीने केंद्र सरकारला विनंती केली आहे .