संतप्त शेतकऱ्यांनी शेतात रचले सरण

By admin | Published: July 10, 2017 12:59 AM2017-07-10T00:59:00+5:302017-07-10T00:59:13+5:30

सिन्नर : सक्तीने जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी सामुदायिक आत्महत्त्या करतील असा इशारा दिला आहे.

Angry farmers created the field | संतप्त शेतकऱ्यांनी शेतात रचले सरण

संतप्त शेतकऱ्यांनी शेतात रचले सरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : प्रस्तावित मुुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी सक्तीने जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी सामुदायिक आत्महत्त्या करतील असा इशारा सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती क्षेत्र असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे. शिवडे येथील शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतामध्ये सरण रचले असून झाडांवर फास लटकवले आहेत. त्यामुळे समृध्दीबाधीत गावांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी शिवडे येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चिता रचल्या. लाकडे रचून त्यावर गोवऱ्या टाकल्या. शासनाने सक्तीने शेतजमिनी संपादनाचा प्रयत्न केल्यास सामुदायिक आत्महत्त्या केल्या जातील असा इशारा यावेळी देण्यात आल्या. शिवडे व परिसरातील जमिनी बागायती असून शेतकरी बारमाही पिके घेतात. सुपीक जमिनी महामार्गासाठी घेतल्यास शेतकरी उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Angry farmers created the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.