कांदा निर्यात बंदी विरोधात संतप्त शेतकरी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:59 PM2019-09-30T17:59:25+5:302019-09-30T18:00:33+5:30

कळवण : केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयाच्या विरोधात व कळवण बाजार समतिीत कांदा व्यापारी बांधवाना खरेदीचे निर्बंध लादल्याने व्यापारी लिलावात सहभागी झाले नसल्याने 425 ट्रॅक्टरमधील 11 हजार क्विंटल कांदा लिलाव झाला नाही त्यामुळे कळवण तालुक्यातील संतप्त शेतकर्यांनी बसस्थानक परिसरात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा बाजी करीत रास्ता रोको करून निषेध नोंदवला यावेळी कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी करु न तहसीलदार बी ए कापसे यांना निवेदन देण्यात आले.

Angry farmers protest against banning onion export | कांदा निर्यात बंदी विरोधात संतप्त शेतकरी रस्त्यावर

कळवण बस स्थानक परिसरात केंद्र शासनाचा विरोधात निदर्शने करत रस्ता रोको आंदोलनात सहभागी शेतकरी बांधव

Next
ठळक मुद्देकळवण : शेतकऱ्यांचा रास्ता रोको, ४२५ ट्रॅक्टर कांद्याची आवक

कळवण : केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयाच्या विरोधात व कळवण बाजार समतिीत कांदा व्यापारी बांधवाना खरेदीचे निर्बंध लादल्याने व्यापारी लिलावात सहभागी झाले नसल्याने 425 ट्रॅक्टरमधील 11 हजार क्विंटल कांदा लिलाव झाला नाही त्यामुळे कळवण तालुक्यातील संतप्त शेतकर्यांनी बसस्थानक परिसरात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा बाजी करीत रास्ता रोको करून निषेध नोंदवला यावेळी कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी करु न तहसीलदार बी ए कापसे यांना निवेदन देण्यात आले.
अतिवृष्टी महापुरामुळे लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इतर राज्यातून येणार्या लाल कांद्याची अवाक घटल्याने गावठी कांद्याचे दर गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक वाढले होते. त्यामुळे शेतकर्यांना अनेक वर्षानंतर दोन पैसे जास्त भाव मिळत होता. मात्र केंद्र शासनाने शहरी भागातील कांदा खाणार्यांची विचार करून निर्यात बंदी करून कांदा भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयन्त केला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज सकाळी नाकोडा येथील कांदा मार्केट यार्डात जवळपास 425 ट्रॅक्टची अवाक झाली होती. शासनाच्या धोरणानुसार व्यापार्यांकडे पाचशे क्विंटल पेक्षा जास्त कांदा साठा नको असल्याने आज कांदा लिलाव झाले नाहीत. तसेच कांदा व्यापारी जिल्हा असोसिएशनची बैठक घेतल्याने सर्व कांदा व्यापारी गेल्याने संतप्त शेतकरी बांधवानी आज सकाळी साडे अकरा वाजता शहरातील बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निर्यात बंदी तात्काळ उठवावी अन्यथा यापेक्षाही मोठे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार बी. ए. कापसे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, जि प चे माजी अर्थ व बांधकाम सभापती रविंद्र देवरे, शिवसेनेचे विभाग प्रमुख शितलकुमार अिहरे, किसान सभा सेक्र ेटरी मोहन जाधव, बाजार समतिी संचालक हरिभाऊ पगार, विष्णु बोरसे, रामा पाटील, गजेंद्र पवार, सचिन वाघ, भरत शिंदे, राकेश आहेर, विनोद जाधव देवा पाटील, संदिप वाघ, बाळासाहेब शेवाळे, विलास रौंदळ, सुभाष पगार, नितीन खैरणार, भिला पाटील, नितीन शिरसाठ, आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण कर्ज माफी न केल्याने आजही शेतकर्यांचे कर्ज तसेच आहे. आता भाव वाढीमुळे दोन पैसे मिळाल्याने शेतकर्यांच्या घरी सुख व आनंदाने दिवाळी साजरी होणार होती मात्र निर्यात बंदी मुळे बाजार पेठा बंद पडल्या आहेत. कांदा निर्यात तात्काळ उठवावी अन्यथा शेतकरी पेटून उठेल. व त्याचे परिणाम राज्यातील सरकारला विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील . स्थानक परिसरात
- देविदास पवार, प्रदेश उपाध्यक्ष, शेतकरी संघटना.

केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी करून रडीचा डाव खेळला आहे. मागच्या वर्षी कांद्याचे भाव कवडीमोल झाले शेतकर्यांनी लाखो रु पये खर्च करून पिकविलेला कांदा उकिरड्यावर फेकला त्यावेळी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार कुठे होते. आता शेतकर्याला दोन पैसे मिळत असतांना निर्यात बंदी करून शेतकर्यांचे कंबरडे मोडत आहे.
- महेंद्र हिरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस.

 

Web Title: Angry farmers protest against banning onion export

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.