संतप्त दुचाकीचालकाची पोलिसाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:05 AM2019-03-16T00:05:10+5:302019-03-16T00:30:58+5:30
रुग्णालयात जात असताना दुचाकीस्वाराला अडविल्यानंतर पोलिसाने अपशब्द वापरल्यानंतर संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने पोलिसाला धक्काबुक्की केल्याने दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी वाहतूक पोलीस ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास समज दिल्यानंतर वाद मिटला.
नाशिकरोड : रुग्णालयात जात असताना दुचाकीस्वाराला अडविल्यानंतर पोलिसाने अपशब्द वापरल्यानंतर संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने पोलिसाला धक्काबुक्की केल्याने दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी वाहतूक पोलीस ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास समज दिल्यानंतर वाद मिटला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार नाशिक-पुणे महामार्गावरील गुरूद्वारासमोर शुक्रवारी दुपारी शहर वाहतूक शाखेकडून विनाहेल्मेटधारी दुचाकीचालकावर कारवाई करण्यात येत होती. यावेळी रुग्णालयात नातेवाईकाकडे जाणाऱ्या दुचाकीचालकास वाहतूक पोलिसांनी अडवून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. दंड न भरणाºया दुचाकी जमा करण्यासाठी टोर्इंगची गाडीही बोलविण्यात आली. टोर्इंग वाहनावरील कर्मचारी आल्यानंतर पोलिसाचा आवाज आणखीनच वाढल्याने वाद अधिक पेटला. रुग्णालयात जाणे महत्त्वाचे असल्याचे दुचाकीस्वार जीव तोडून सांगत असतानासुद्धा वाहतूक पोलिसाकडून अर्वाच्च बोलणे सुरूच होते. यावेळी बघ्यांनीदेखील त्या कर्मचाºयास समजविण्याचा प्रयत्न केला. अखेर तेथे आलेल्या पोलीस अधिकाºयाने मध्यस्ती केल्यानंतर वाद मिटला. त्यानंतर संबंधित अधिकाºयाने त्या वाहतूक पोलिसालादेखील चांगलेच सुनावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वाहतूक शाखेकडून थेट दंडात्मक कारवाईवरच भर दिला जात असल्याने दुचाकीचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये अशाच प्रकारचे वाद घडत आहेत.