कमी भाव मिळाल्यामुळे संतप्त कांदा उत्पादकांनी पाडले लिलाव बंद; जोपर्यंत सरकार...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 09:41 AM2023-02-27T09:41:01+5:302023-02-27T09:42:14+5:30
गेल्या काही दिवसापासून कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे.
शेखर देसाई
लासलगाव (जि नाशिक) - कमी झालेल्या कांदा भावाच्या निषेधार्थ लासलगाव बाजार समितीमध्ये उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत संताप व्यक्त केला. कांद्याचे लिलाव बंद पाडल्यास शासनाने जोपर्यंत कांद्याला अनुदान जाहीर करत नाही तोपर्यंत सुरू करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. सकाळी लासलगाव बाजार समिती ८५० ट्रॅक्टर मधून कांदा आवक झाली होती. सकाळी साडेआठ वाजता कांदा लिलाव सुरू झाली. सुरुवातीला २० ट्रॅक्टर मधील कांद्याचा लिलाव ४७० ते ८०० रुपये या भावाने पुकारल्यानंतर संतप्त कांदा उत्पादकांनी कांद्याचे लिलाव बंद केले.
जोपर्यंत राज्य सरकार विक्री झालेल्या कांद्याला पदर सुपे अनुदान जाहीर करत नाही तोपर्यंत कांदा लिलाव सुरू करणार नाही अशी भूमिका संघटनेचे नेते सतत शेतकऱ्यांसोबत बोलताना व्यक्त केले. गेल्या काही दिवसापासून कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे. शासनाकडे मुख्यमंत्र्यांपर्यंत संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर निवेदन देण्यात आली परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे. जोपर्यंत वाढलेल्या मागेमुळे कांद्याला ३० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर होत नाही आणि शासन किमान दहा ते पंधरा रुपये प्रति क्विंटल विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देणार नाहीत तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने कांद्याचे लिलाव होऊ देणार नाहीत अशी भूमिका कांदा उत्पादकांनी घेतलेली आहे. सकाळी मोठ्या प्रमाणावर लासलगाव बाजार समिती कांदा उत्पादक जमले असून लासलगावचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
कांदा दराच्या निषेधार्थ लासलगाव बाजार समितीमध्ये उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला #onionFarmerpic.twitter.com/tsNnov7aDn
— Lokmat (@lokmat) February 27, 2023