संतप्त पालकांचे शाळेसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 01:33 AM2021-08-05T01:33:32+5:302021-08-05T01:33:57+5:30
कोरोना संकटामुळे शिक्षण संस्था बंद असतानाही शाळांकडून वार्षिक शैक्षणिक शुल्क आकारले जात आहे. या विरोधात संतप्त पालकांसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आडगाव शिवारात असलेल्या शायनिंग स्टार शाळेविरोधात आंदोलन करून, शाळा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
पंचवटी : कोरोना संकटामुळे शिक्षण संस्था बंद असतानाही शाळांकडून वार्षिक शैक्षणिक शुल्क आकारले जात आहे. या विरोधात संतप्त पालकांसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आडगाव शिवारात असलेल्या शायनिंग स्टार शाळेविरोधात आंदोलन करून, शाळा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शालेय शुल्कात पन्नास टक्के कपात करावी, काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झाले आहे, त्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशा मागण्या करण्यात येऊन निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना आम आदमी पार्टी प्रहार संघटना व भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.