पकडून दिलेल्या दारु भट्ट्यांबाबत कारवाई न केल्याने संतप्त महिलाचा पोलिस ठाण्यात येऊन विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 07:16 PM2020-01-02T19:16:38+5:302020-01-02T19:24:16+5:30
लोकमत न्युज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : गावात राजरोस सुरु असलेल्या दारु भट्यांविरोधात तेथील महिलांनी पुढाकार घेऊन रसायनासह अन्य साहित्य पकडून ...
लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : गावात राजरोस सुरु असलेल्या दारु भट्यांविरोधात तेथील महिलांनी पुढाकार घेऊन रसायनासह अन्य साहित्य पकडून पोलिसांच्या हवाली केले मात्र त्यानंतर त्र्यंबक पोलिसांकडून पुढील कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त महिलांनी पोलिस स्टेशनमध्ये येवून आपला रुद्रावतार दाखविला, मात्र अखषर नाराज होवून त्या वरिष्ठांकडे जाणार असल्याचे सांगत माघारी परतल्या.
तळेगाल (अंजनेरी) येथील बचत गटाच्या महिलांनी गुरुवारी (दि.२) त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात येऊन रणरागिणी बनत आम्ही गावातील महिला पोलीस पाटील यांच्या सहाय्याने गावाच्या शिवारातील गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य रसायन गॅस सिलेंडर आदी साहित्य व तीन हजार लिटर तयार दारु पकडुन दिली होती.
साहेब, तुम्ही स्वत: येऊन पाहणी केली होती. पोलीसांसमवेत तुम्ही स्वत:हजर असतांना अद्याप दारु उत्पादक व दारु विक्रेते मोकाट आहेत. त्यांचा पुन्हा नव्या जोमाने व्यवसाय सुरु आहे. आपण केलेल्या कारवाईचे पुढे काय झाले, हे विचारण्यासाठी या महिलांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आल्या होत्या.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) या गावात गावठी दारुची सर्रास विक्र ी होत असल्याने त्याचा खरा त्रास महिला वर्गालाच होत असतो. शेवटी घरात रोजच्या कटकटी भांडणे प्रसंगी बायकांना मारहाण या रोजच्या त्रासाला कंटाळून महिला स्वत:च रणरागिणी बनत महालक्ष्मी बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेत सुमारे ३००० लिटर दारु पोलीसांना पकडुन दिली.
यावेळी दारु ची पिपे, टाक्या, गॅसचे सिलेंडर आदी मुद्देमाल उचलुन आणुन त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात जप्त केला. त्यानंतर कडक कारवाई करतो असे सांगुन महिलांना शांत केले. पण दारु व्यावसायिक अधिक निभीॅड झाले व त्यांचा दारु व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने सुरु झाला.
याउलट तक्र ारदार महिलांना आडुन पाडुन, बोलणे टोमणे मारणे सुरु केले. पोलिसांनी या प्रकरणी काहीच कारवाई न केल्याने पुन्हा या महिला संतप्त झाल्या व त्यांनी भुरुवारी रणरागिणी बनुन त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यावर धडकल्या.
त्यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांना पुनश्च निवेदन देत जाब विचारला. त्या म्हणाल्या, आपण तर म्हणाला होतात आम्ही त्वरीत कार्यवाही करु तुम्ही काही काळजी करु नका तुम्हीच होताना? तुम्ही स्वत: आले होते. असे असताना पुढे कोणतीहि कारवाई झाली नाही? काबर दारु भट्ट्यांविरुध्द कारवाई केली नाहीत? असे म्हणुन साहेबाना विचारले.
तुमच्याने पोलिसी कारवाइ होणशर नसेल तर आम्ही नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक आरती सिंह, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेऊन आमची कैफीयत मांडणार असल्याचे सांगुन सर्व महिला पोलिस ठाण्यातून माघशरी फिरल्या. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात याविषयावरच चर्चा रंगत होत्या.