संतप्त महिलांनी अडविली घंटागाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:37 AM2019-08-25T00:37:49+5:302019-08-25T00:38:07+5:30

सामनगावरोड शासकीय तंत्रनिकेतन शेजारील घरकुल योजना इमारतीमध्ये घंटागाडी केरकचरा संकलित करण्यासाठी येत नसल्याने संतप्त महिला रहिवाशांनी शुक्रवारी दुपारी घंटागाडी अडवून मनपा प्रशासनाचा निषेध केला.

 Angry women stopped by | संतप्त महिलांनी अडविली घंटागाडी

संतप्त महिलांनी अडविली घंटागाडी

Next

नाशिकरोड : सामनगावरोड शासकीय तंत्रनिकेतन शेजारील घरकुल योजना इमारतीमध्ये घंटागाडी केरकचरा संकलित करण्यासाठी येत नसल्याने संतप्त महिला रहिवाशांनी शुक्रवारी दुपारी घंटागाडी अडवून मनपा प्रशासनाचा निषेध केला.
प्रभाग १९ मधील सामनगांवरोड येथील घरकुल योजनेच्या इमारतीत गेल्या काही दिवसांपासून घंटागाडी केरकचरा संकलित करण्यास येत नसल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. घरकुल योजना इमारतीतील घरे अगोदरच अत्यंत छोटी असल्याने रहिवाशांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यात दैनंदिन घरातील केरकचरा कुठे साठवून ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. उघड्यावर मोकळ्या जागेच केरकचरा टाकला तर मनपा आरोग्य विभागाकडून आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात येते. ओला-सुका कचरा वर्गीकरण करावा लागतो. ओला कचरा कुजत असल्याने मोठी दुर्गंधी पसरते. त्यात घंटागाडी नियमीत येत नसल्याने रहिवासी व विशेष करून महिलांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिला रहिवाशांनी शुक्रवारी दुपारी घरकुल इमारत आवारात आलेली घंटागाडी रोखुन धरली होती. केरकचऱ्याने भरलेले डस्टबीन घंटागाडीपुढे ठेवत हा कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न विचारत घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना महिलांनी जाब विचारला. शेवटी घंटागाडी चालकांने दररोज नियमितपणे वेळेवर येण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त महिलांनी घंटागाडी सोडली. दरम्यान महिलांच्या आंदोलनावेळी प्रभाग समितीची सभा सुरू असल्याने त्याचे पडसाद सभेत उमटले.

Web Title:  Angry women stopped by

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.