पिंपळगावी संतप्त महिलांचा ग्रामपंचायत सदस्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:16+5:302021-06-16T04:18:16+5:30

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या म्हसोबा चौकात असलेल्या रेशन धान्य दुकान क्रमांक ...

Angry women surround Pimpalgaon Gram Panchayat members | पिंपळगावी संतप्त महिलांचा ग्रामपंचायत सदस्यांना घेराव

पिंपळगावी संतप्त महिलांचा ग्रामपंचायत सदस्यांना घेराव

Next

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या म्हसोबा चौकात असलेल्या रेशन धान्य दुकान क्रमांक ४च्या मनमानी कारभाराच्या विरोधात रेशन धान्यधारक महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट आपला मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर नेऊन ग्रामसदस्यांनाच घेराव घालत रेशन दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे .

शहरातील म्हसोबा चौकातील तीन नंबरचे दुकानदार हे सतच रेशन धान्य वाटप करताना रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना अरेरावी करत गरिबीची थटा करत असतात. रेशन धान्य दुकानात धान्याचा भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात करत आहे. शासनाने नेमून दिलेल्या वेळेत रेशन धान्य दुकानदेखील उघडत नसल्याने कोरोनाच्या या महामारीत व लॉकडाऊनच्या काळात असंख्य लाभार्थ्यांना रेशन घेण्यासाठी रांगा लावून ताटकळत उभे राहावे लागते आणि रेशन धान्य दुकानदार आपल्या सोयीने ११ वाजता दुकान उघडून आपली मनमानी करत आहे. त्यामुळे या रेशन धान्य दुकानदारांची चौकशी करून व लाभार्थ्यांचे होणारे अपमान बंद व्हावे यासाठी महिलांनी मंगळवार, दि.१५ रोजी एकत्र येत मुजोर दुकानमालकांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी कार्डधारक लखन गांगुर्डे, लीलाबाई वाघ, जुलैखा राहिम, शीला चौधरी, माया पवार, संगीता दुधाळे, इमाम पिंजारी, लता वायकांडे, शुभांगी आहेर, छाया वाघ, मोहिनी पगारे, पायल आहेर, आदिनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केली आहे व तातडीने योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिले आहे.

-------------------------

वेळोवेळी तक्रार असूनही कारवाई नाही..?

परिसरातील रेशन धान्य दुकान नंबर ४ संदर्भात अनेक वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार देऊनही कारवाई करण्याची हिंमत कोणत्याच अधिकारी वर्गाने केली नसल्याचा आरोप कार्डधारकांनी केला आहे ..! (१५ पिंपळगाव १)

..................................

--------------------------

मी सकाळी ७ वाजल्यापासून रेशन घेण्यासाठी या ठिकाणी नंबर लावून बसले, मात्र दुपारी १२ वाजले तरी दुकान उघडले नाही आणि दुपारी दुकानदार आला आणि आज बंद वार आहे. उद्याकडे या असं सांगून निघून गेला. आमचा पूर्ण दिवस वाया गेला. शिवाय रोजंदारी ही बुडाली. आम्ही या दुकानदाराला सांगायला गेलो, तर त्याने आम्हाला खडे बोल सुनावले. त्यामुळे आम्ही एकत्र होत ग्रामपंचायत कार्यालय गाठले.

-लीलाबाई वाघ, रेशनधारक

....................

शहरातील कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी रेशन धान्य दुकानदारांनी घ्यावी. कोरोनाचे नियम पाळून दररोज धान्य वितरित करावे म्हणजे दुकानांवर गोंधळ निर्माण होणार नाही. चार नंबर दुकानाबाबत जी तक्रार नागरिकांनी केली आहे त्या संदर्भात निफाड पुरवठा विभाग व तहसीलदार यांना पत्र पाठवून सदर दुकानांवर कारवाई करण्यासाठी मागणी केली जाईल.

-गणेश बनकर, ग्रामपंचायत सदस्य

...............................

पिंपळगाव बसवंत येथील रेशन धान्य दुकान नंबर चार संदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. त्या संदर्भात कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल.

- शरद घोरपडे, तहसीलदार, निफाड

..........

===Photopath===

150621\15nsk_10_15062021_13.jpg

===Caption===

१५ पिंपळगाव १

Web Title: Angry women surround Pimpalgaon Gram Panchayat members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.