अनिल कदम - बनकर यांच्यात काट्याची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 01:29 AM2019-10-08T01:29:23+5:302019-10-08T01:30:21+5:30
विधानसभा निवडणुकीत ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ६ उमेदवार शिल्लक असून, या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल कदम, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिलीप बनकर यांच्यातच खरी लढत होण्याची चित्रे आहेत.
निफाड : विधानसभा निवडणुकीत ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ६ उमेदवार शिल्लक असून, या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल कदम, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिलीप बनकर यांच्यातच खरी लढत होण्याची चित्रे आहेत.
अर्ज छाननीनंतर ९ उमेदवारांचे १६ अर्ज शिल्लक राहिले होते. सोमवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी चैताली कदम, रमेश गवळी, सुरेश गांगुर्डे या ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ६ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत
अनिल कदम यांना ७८१८६ मते आणि दिलीप बनकर यांना ७४२६२ मते, भाजपचे वैकुंठ पाटील यांना १८०३१ मते, कॉँग्रेसचे राजेंद्र मोगल यांना ५८७१ मते, तर बसपाचे धर्मेंद्र जाधव यांना ३२०९ मते मिळाली होती अनिल कदम यांनी ३९२१ मतांची आघाडी घेत दिलीप बनकर यांचा पराभव केला होता.
मागील निवडणुकीत भाजप-सेना स्वतंत्र लढली होती आणि कॉँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढली होती. यावेळेस भाजप-सेना एकत्र आहे तर कॉँग्रेस -
राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र आहेत; मात्र बहुजन विकास आघाडीचे उमेदवार यतीन कदम हे आमदार अनिल कदम यांचे चुलत बंधू असून, ते ओझरचे असून, तेही या निवडणुकीत दमदारपणे उतरल्याने निफाडच्या या निवडणुकीतील राजकीय उत्कंठा वाढली आहे.
यतीन कदम यांच्या दमदार एंट्रीमुळे अनिल कदम आणि दिलीप बनकर या दोघातील निवडणुकीची लढत काट्याची होते का याकडे निफाडकरांचे लक्ष लागले आहे.
रिंगणातील उमेदवार...
अनिल कदम (शिवसेना), दिलीप बनकर, (राष्ट्रवादी कॉँग्रेस), यतीन कदम (बहुजन विकास आघाडी), उत्तम निरभवणे (बसपा), संतोष आहेरराव, (वंचित बहुजन आघाडी), सय्यद कलीम लियाकत (अपक्ष)
२०१४ मध्ये होते ७ उमेदवार ।
यंदा आहेत एकूण ६ उमेदवार