कॅल्शिअम कमी झाल्याने जनावरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:30 PM2020-01-01T23:30:13+5:302020-01-01T23:30:46+5:30

मानोरी : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय केला जातो. येवला तालुक्यात दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती ...

Animal conditions due to calcium depletion | कॅल्शिअम कमी झाल्याने जनावरांचे हाल

कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे एका जागेवर बसून असलेली गाय पाळण्याच्या साहाय्याने उभी करताना शेतकरी.

Next
ठळक मुद्देमानोरी : पाळण्याचा आधार; चाराटंचाईमुळेही आरोग्यावर परिणाम

मानोरी : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय केला जातो. येवला तालुक्यात दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यात उपासमारीमुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने जनावरांना
अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कॅल्शिअम कमी झाल्याने जनावरांची हालचाल मंदावली आहे.
कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे जनावरे एका ठिकाणी बसल्यानंतर पुन्हा स्वत:च्या पायांवर उभे राहू शकत नाही. मानोरी बुद्रुक परिसरात ठिकठिकाणी जनावरे एकाच ठिकाणी तासन्सात बसलेले दिसून येतात. बसलेल्या जनावराला उभे करण्यासाठी दहा ते बारा माणसांची मदत घ्यावी लागत आहे. शेतकामामुळे माणसेदेखील मिळत नाहीत. पुन: पुन्हा असे करण्यासाठी माणसे कुठून शोधायची, असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे येथील पशुवैद्यकीय डॉ. संदीप शेळके यांनी एक अनोखा उपाय शोधला आहे. त्यांनी पाळणा तयार केला आहे. या पाळण्यामुळे बसलेल्या जनावरांना एकटा माणूस उभे करू शकतो. दुष्काळी स्थितीमुळे जनावरांना वेळेत चारा मिळत नाही. परिणामी उपासमारीमुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे जनावरे दगावण्याचीदेखील शक्यता निर्माण होऊ शकते, असे डॉ. शेळके यांनी सांगितले.

माझी गाय अनेक दिवसांपासून कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे
एका जागेवर बसून आहे. बसलेल्या गायीला उभे करण्यासाठी दहा ते बारा माणसे शोधावी लागत होती. मात्र पाळण्याच्या साहाय्याने आता मी एकटा गायीला उभी करून तिची मॉलिश करून सहज उपचार करू शकतो.
- अशोक शेळके, शेतकरी

दुष्काळी स्थितीमुळे जनावरांना वेळेत चारा न मिळाल्याने त्यांच्या शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाले आहे. कॅल्शिअमअभावी त्यांची हालचाल मंदावते. त्यामुळे जनावरे एकाच जागेवर बसून राहतात. त्यामुळे त्यांना अर्धांगवायू होण्याचा धोका आहे. कॅल्शिअम कमतरता असलेल्या जनावरांना एकटा माणूस उभा करून शकत नाही. पाळण्यामुळे एकटा माणूसही बसलेल्या जनावरास उभे करू शकतो.
- संदीप शेळके, पशुवैद्यक, मानोरी बु.

Web Title: Animal conditions due to calcium depletion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.