पशुसंवर्धन विभागामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:28 PM2019-05-09T23:28:35+5:302019-05-10T00:08:03+5:30
भास्कर सोनवणे घोटी : इगतपुरी पशुसंवर्धन विभागाने तालुक्यात कोठेही चारा टंचाई नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तालुक्याच्या कानाकोपºयात तीव्र चारा टंचाई असतानाही ८२ हजार टन चारा उपलब्ध आहे. हा चारा अजून ४ महिने पुरेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात परीस्थिती वेगळी असल्याने शेतकऱ्यांनी या कारभारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भास्कर सोनवणे
घोटी : इगतपुरी पशुसंवर्धन विभागाने तालुक्यात कोठेही चारा टंचाई नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तालुक्याच्या कानाकोपºयात तीव्र चारा टंचाई असतानाही ८२ हजार टन चारा उपलब्ध आहे. हा चारा अजून ४ महिने पुरेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात परीस्थिती वेगळी असल्याने शेतकऱ्यांनी या कारभारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गवत आणि चाºयासाठी नागरिक इतर तालुक्यात वणवण फिरत असतांना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीमुळे लोकांच्या संतापात भर पाडली आहे.
इगतपुरी तालुक्यात ह्या वर्षी जनावरांसह माणसांनाही तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाणी आणि चाºयाअभावी जनावरांचे मृत्यू होत आहेत. घोटीच्या बाजार समितीत मातीमोल किमतीत जनावरे विकायला येत आहेत. अशा भयानक स्थितीत पशुधन धोक्यात असूनही पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाची असंवेदनशीलता समोर आली आहे.
तालुक्यात मोठी जनावरे ६२ हजार ९०८ तर लहान जनावरे ४ हजार ६९९ आहेत. ह्या सर्व जनावरांसाठी सद्यस्थितीत ८२ हजार टन चारा तालुक्यात शिल्लक आहे. येत्या सप्टेंबर महिनाअखेर पर्यंत हा चारा पुरेल अशी माहिती इगतपुरीचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रदीप कागणे यांनी दिली.
इगतपुरी तालुक्यातील जनावरांना एका दिवसाला किमान ३ लाख ८६ हजार लिटर पाणी लागते. जनतेलाच पाणी नसल्याने चारा आणि पाण्यामुळे हतबल झालेल्या शेतकºयांनी घोटीच्या बाजार समितीत जनावरांची मातीमोल भावात विक्र ी सुरू केल्याचेही समोर आले आहे. दुधाच्या एकंदर उत्पन्नापैकी ४० टक्के दूध उत्पादन घटले आहे. तीव्र उन्हाळा, पाणी, चारा आदींमुळे जनावरे रोगग्रस्त होत असूनही तालुक्यातील १४ पशुवैद्यकीय केंद्रांतील पशु वैद्यकीय अधिकारी दुसरीकडे उपचारासाठी गेल्याच्या नावाखाली गायब राहत असल्याची लोकांची तक्र ार आहे.
इगतपुरी तालुक्यात ८२ हजार टन चारा अजून ४ महिने पुरेल. इतर तालुक्याला सुद्धा इगतपुरीतुन चारा पाठवता येईल. ह्या तालुक्यात चाराटंचाई अजिबात नाही. टंचाई वाटत असेल तर महसूल विभाग योग्य कार्यवाही करील.
- डॉ. प्रदीप कागणे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, इगतपुरी
तीव्र स्वरूपाची दाहक पाणी टंचाई आणि चाºयाची भयानक टंचाई असतानाही पशुसंवर्धन विभाग लोकांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. १५ दिवस चारा पुरेल अशी स्थिती नसतांना ४ महिने पुरेल असे सांगतांना काही वाटत नाही. कार्यालयात बसून आकडेवारी काढून इगतपुरी तालुक्याला मूर्ख बनवले जात असेल तर तीव्र आंदोलन करावे लागेल.
- लकी जाधव, प्रदेश नेत,े आदिवासी विकास परिषद.
चारा पाण्यामुळे जनावरे अखेरचा श्वास घेतांना दिसतात. अत्यल्प किमतीत जनावरे विकायला काढली जात आहेत. शेतकºयाला पाणी नसल्याने तो आधीच त्रस्त आहे. जनावरांना चारा-पाणी कोठून आणावे, याची भ्रांत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.
- दादा घाडगे, शेतकरी, पिंपळगाव घाडगा.