पशुपालकांचा अभ्यास दौरा
By Admin | Published: September 2, 2016 09:50 PM2016-09-02T21:50:55+5:302016-09-02T21:51:07+5:30
बागलाण : राहुरी विद्यापीठाची पाहणी
नामपूर : येथील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशुधन अधिकारी डॉ. उज्ज्वलसिंग पवार यांनी कामधेनू योजनेअंतर्गत तालुक्यातील पशुपालकांसाठी राहुरी विद्यापीठात अभ्यास दौरा आयोजित केला होता. यात २६ गावांच्या पशुपालकांनी सहभाग घेतल होता.
प्रारंभी सर्व पशुपालकांना एकत्र जमवून तहसीलदार सुनील सौदाणे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, डॉ. उज्ज्वलसिंग पवार यांनी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून सहलीला प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पशुपालकांनी उस्मानाबादी, राजस्थानी, संगमनेरी आदि जातीच्या शेळ्या व सर्वात जास्त दूध देणाऱ्या जर्शी जातीच्या गायींची माहिती घेतली. शिवाय गावरान जातीच्या कडकनाथ व आरआरआय या देशी कोंबड्यांबाबत माहिती जाणून घेतली.
आनंद सालुंखे यांनी राहुरी विद्यापीठाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. सहल यशस्वीतेसाठी उज्ज्वल पवार, एम. एन. मोरे, संदीप नारले, आर. के. जनकवाडे, डा.ॅ अरविंद धाबेकर, अनिल अहिरे आदिंनी परिश्रम घेतले. कपिल खंडाले .आनंदा कूटे .राजेन्द्र मोरे आदिंनी परिश्रम घेतले .(वार्ताहर)