वडेल शिवारातून जनावरे चोरणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 11:44 PM2020-12-24T23:44:26+5:302020-12-25T01:10:37+5:30
मालेगाव मध्य : तालुक्यातील वडेल येथील जनावरे चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधार वसीम अहमद मोहम्मद असलम कुरेशी यास विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मागील आठवड्यात वडेल येथून ११ जनावरे चोरीस गेली होती. तालुक्यातील शेती उपयोगी जनावरांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याची गंभीर दखल घेत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी तपासाच्या सूचना देत तातडीची उपाययोजना करण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती केली होती. या प्रकरणात वसीमचा सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यास खांडवी यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आर. के. घुगे, पोलीस कर्मचारी भूषण खैरनार, पंकज भोये, संदीप राठोड व प्रकाश बनकर यांनी काल ताब्यात घेतले होते. वसीमने चोरीची कबुली दिली आहे. चोरीची जनावरे घेणाऱ्यांची नावे उघड झाल्यावर शहरातील व शहराबाहेरील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे