पिंपळगाव शहरात जनावर चोरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 09:51 PM2020-10-11T21:51:25+5:302020-10-12T01:09:19+5:30
पिंपळगाव बसवंत : गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव बसवंत शहरात गायी चोरांचा सुळसुळाट झाला असून हे चोरटे मध्यरात्री येऊन शहरातील जनावरांना बेशुद्ध करत गाडीत टाकून नेत असल्याच्या घटना वेळोवेळी घडत असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
पिंपळगाव बसवंत : गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव बसवंत शहरात गायी चोरांचा सुळसुळाट झाला असून हे चोरटे मध्यरात्री येऊन शहरातील जनावरांना बेशुद्ध करत गाडीत टाकून नेत असल्याच्या घटना वेळोवेळी घडत असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. रविवार (दि.11) रोजीच्या पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी मोकाट गाई पळविणार्या अज्ञात चोरट्यांनी मातंगवाडा, परिसरातुन एक गाय पळवून नेली, तर तीन गायीना बेशुद्ध अवस्थेत सोडून पलायन केल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला.त्यामुळे परिसरात सातत्याने गाईच्या चोरीचा प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या गलथन कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रविवारी शहरातील मार्केट यार्ड, मातंगवाडा परिसरात बसलेल्या मोकाट जनावराना रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी जवळपास 4 गाईंना भुलीच्या इंजेक्शनच्या सहाय्याने बेशुद्ध केले.त्यापैकी एका जनावरास वाहनात टाकत असताना स्थानिक नागरिकांनी बजरंग दलचे गोविंद सोनवणे,विजू चोपडे,नाना पवार,गणेश पवार,रवी वारडे आदीना ही माहिती दिली तातडीने ते घटनास्थळी पोहचल्याने चोरट्यांनी उर्विरत तीन बेशुद्ध जनावरांना परिसरातच सोडून पळ काढल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासह पशु वैद्यकीयदूताने बेशुद्ध जनांवरांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केले सध्या त्या तिन्ही गाई बचवल्या आहे.