खासगी दौºयानिमित्त नाशिकला आलेले पशुसंवर्धनमंत्री महादेव महादेव जानकर दर्शनार्थ त्र्यंबकेश्वरला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:05 AM2018-01-17T00:05:26+5:302018-01-17T00:19:43+5:30
त्र्यंबकेश्वर : खासगी दौºयानिमित्त आलेले पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. मंगळवारी (दि. १६) जानकर यांचे त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले.
त्र्यंबकेश्वर : खासगी दौºयानिमित्त नाशिकला आलेले पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. मंगळवारी (दि. १६) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जानकर यांचे त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन अभिषेक केला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी यांनी देवस्थानच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व भगवान त्र्यंबकराजाची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. जानकर यांनी स्थानिक अधिकाºयांशी चर्चा करून आपल्या खात्याच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेत काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. जानकर पांढुर्ली येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त संजय विसावे, तहसीलदार महेंद्र पवार, संतोष शिंदे आदींसह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.