जनावरे कोंबलेली पीकअप उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:31 AM2019-02-10T00:31:14+5:302019-02-10T00:31:29+5:30
१५ जनावरे निर्दयतेने कोंबून नामपूरहून मालेगावकडे येत असलेली पीकअप (क्र. एमएच ४१ जे. ८९२४) उलटून झालेल्या अपघातात एक जनावर दगावले आहे. या प्रकरणी परिसरात संताप व्यक्त केला जात असून, फरार वाहनचालका- विरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर १४ जनावरांना रावळगाव येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे.
वडनेर : १५ जनावरे निर्दयतेने कोंबून नामपूरहून मालेगावकडे येत असलेली पीकअप (क्र. एमएच ४१ जे. ८९२४)
उलटून झालेल्या अपघातात एक जनावर दगावले आहे. या प्रकरणी परिसरात संताप व्यक्त केला जात असून, फरार वाहनचालका- विरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर १४ जनावरांना रावळगाव येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे.
कत्तलीच्या हेतूने १५ जनावरे कोंबून मालेगावकडे येत असलेली पीकअप सातमाने शिवारातील दादाजी जाधव यांच्या शेताजवळ उलटलेल्या अवस्थेत पप्पू जाधव, दिलबर जाधव, संजय जाधव, राकेश जाधव, समाधान निकम, शिवराज जाधव, सरपंच शीतल जाधव, अलका जाधव, मंगला जाधव, ज्योती जाधव, पुष्पा जाधव यांना दिसून आली. जनावरे वाहनात कोंबलेल्या अवस्थेत असल्याने त्यांनी तातडीने जनावरांची सुटका केली. या घटनेत एका जनावराचा मृत्यू झाला.
सामाजिक कार्यकर्ते शिवराज जाधव यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांत खबर दिली. पशुवैद्यकीय अधिकारी अभिमन निकम व अहिरे यांनी जनावरांची तपासणी केली. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात पीकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार बी. पी. काळे हे करीत आहेत.