मेथीच्या शेतात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:27 PM2019-12-15T23:27:33+5:302019-12-16T00:31:00+5:30

येवला तालुक्यातील राजापूर बाजार परिसरात सध्या मेथीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कवडीमोल दर मिळत आहे. दोन रुपयांना जुडी मिळत असल्याने अनेकांवर मेथी फेकून देण्याची वेळ आली आहे. कांद्याची रोपे मिळत नसल्याने शेतकºयांनी मेथीला पसंती दिली होती, मात्र प्रचंड आवकेमुळे मेथीला बाजारभाव नसल्याने परिसरातील शेतकºयांनी मेथीच्या शेतात जनावरे सोडल्याचे विदारक चित्र आहे.

Animals left in fenugreek fields | मेथीच्या शेतात सोडली जनावरे

कवडीमोल दर मिळत असल्याने राजापूर येथील शेतकऱ्याने मेथीच्या शेतात सोडलेली जनावरे.

Next
ठळक मुद्देराजापूर : कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा संताप

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर बाजार परिसरात सध्या मेथीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कवडीमोल दर मिळत आहे. दोन रुपयांना जुडी मिळत असल्याने अनेकांवर मेथी फेकून देण्याची वेळ आली आहे. कांद्याची रोपे मिळत नसल्याने शेतकºयांनी मेथीला पसंती दिली होती, मात्र प्रचंड आवकेमुळे मेथीला बाजारभाव नसल्याने परिसरातील शेतकºयांनी मेथीच्या शेतात जनावरे सोडल्याचे विदारक चित्र आहे.
बियाणांसाठी केलेला खर्चही वसूल झाला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. मेथीची मोठी आवक झाल्याने फुकटही कोणी घ्यायला तयार नाही. शेतकºयांना बियाणांसाठी एकरी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च झाला असून, हाती काही आले नाही. त्यामुळे मेथीच्या शेतात जनावरे चरावयास सोडून दिल्याची प्रतिक्रिया संतप्त शेतकºयांनी दिली. त्याचप्रमाणे रब्बीची पिकेही धोक्यात आहेत.
सध्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा व करपा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मेथी महिना-दीड महिन्यात येत असल्याने बºयाच शेतकºयांनी कांद्याची रोपे नसल्याने मेथीला पसंती दिली, मात्र मेथीचे भाव गडगडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. यावर्षी संपूर्ण रब्बी हंगामातील पिकांवर औषधांचा खर्च वाढला आहे. एवढे करूनही असे झाले तर कर्जाचा डोंगर शेतकºयांच्या माथी राहील. सध्या कांद्याला दर असल्याने शेतकरी कांद्यासाठी मोठी कसरत करीत आहेत. राजापूर परिसरातील कांदा पीक अजून एक महिन्याच्या आसपास निघेल. तोपर्यंत बाजारभाव टिकेल की नाही, याची अजिबातच शाश्वती नाही.

Web Title: Animals left in fenugreek fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.