टमाट्याच्या शेतात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:53 AM2018-04-17T01:53:45+5:302018-04-17T01:53:45+5:30

हजारो रु पये खर्च करून टमाट्याचे उत्पादन घेतले. परंतु झालेला खर्च निघेल एवढादेखील बाजारभाव मिळत मिळत नसल्याने कळवण तालुक्यातील टमाटे उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. गांगवन येथील येथील बाळासाहेब दादाजी जाधव या शेतकऱ्याने सोमवारी (दि. १६ ) सरकारवर तीव्र संताप व्यक्त करून सरकारच्या भूमिकेचा निषेध करत आपल्या एकरभर टमाटा पिकात शेळ्या सोडल्या.

 Animals left in tamaric fields | टमाट्याच्या शेतात सोडली जनावरे

टमाट्याच्या शेतात सोडली जनावरे

Next

कळवण : हजारो रु पये खर्च करून टमाट्याचे उत्पादन घेतले. परंतु झालेला खर्च निघेल एवढादेखील बाजारभाव मिळत मिळत नसल्याने कळवण तालुक्यातील टमाटे उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. गांगवन येथील येथील बाळासाहेब दादाजी जाधव या शेतकऱ्याने सोमवारी (दि. १६ ) सरकारवर तीव्र संताप व्यक्त करून सरकारच्या भूमिकेचा निषेध करत आपल्या एकरभर टमाटा पिकात शेळ्या सोडल्या. कळवण तालुक्यात कळवण खूर्द, कळवण बु, भुसणी, शिरसमणी, बगडू, भादवण, गांगवण आदी परिसरात मोठ्या प्रमाणात टमाट्याचे उत्पादन घेतले जाते. शेजारील गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, भरोच, बिल्लीमोरा तसेच नाशिकच्या बाजार समितीत टमाटे विक्र ीसाठी घेऊन जातात. मात्र बाजारभाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्च सुध्दा निघत नसल्याने टमाटे घेऊन जाणाºया गाडीचे भाडे काही शेतकºयांना खिशातून द्यावे लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. ऊस, कांद्यासोबत भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याला प्राधान्य देणाºया कळवण तालुक्यात भाजीपाला उत्पादनाला मोठ्या प्रमाणात शेतकरी प्राधान्य देतात. कळवण तालुक्यात ३ हजार हेक्टर क्षेत्रात टमाट्याचे उत्पादन घेतले जाते तर मिरचीचे उत्पादन २५०० हेक्टर तर कोबीसह इतर भाजीपाल्या चे १५०० हेक्टर क्षेत्रात उत्पादन घेतले जाते. भाजीपाला तर थेट सुरत, मुंबईच्या बाजारात जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून टमाटा उत्पादक पूर्णत: खचला आहे टमाट्याला मातीमोल दर मिळत आहे. खचर्ही निघेल एवढाही दर मिळत नसल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. शेतातून टमाटे काढण्याएवढे पैसे हातात येत नसल्याने बाजारात विकण्यापेक्षा गांगवणच्या बाळासाहेब जाधव यांनी एकरभर टमाट्याच्या पिकात जनावरे चारण्याला पसंती दिली आहे. टमाट्याचे दर सातत्याने चढउतार होत असतात. आता दर नाही मिळाला तर चार महीन्यांनी दर मिळेल, या आशेने टमाट्याची लागवड करतात. सहजासहजी हार न मानणारा शेतकरी आता टमाटे काढणीलाही परवडेना झाला असल्यामुळे पूर्णत: खचला असून नैराश्येतून टमाटे रस्त्यावर ओतून देत आहे तर कुठे नांगर फिरवत आहे.

Web Title:  Animals left in tamaric fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.