भाजीपाला पिकात सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 02:12 PM2020-03-05T14:12:15+5:302020-03-05T14:12:50+5:30
पाटोदा :- सध्या शेतमालाचे भाव रोजच गडगडत असल्याने भाजीपाला व इतर पिकांसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.
पाटोदा :- सध्या शेतमालाचे भाव रोजच गडगडत असल्याने भाजीपाला व इतर पिकांसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. बाजारात कोणत्याच मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकात चरण्यासाठी गुरे सोडून संताप व्यक्त केला आहे. काही शेतकरी भाजीपाला पिके नांगरून टाकत असतांनाचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.
आॅक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम वाया गेला . हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला .तसेच या अवकाळी पावसाने कांदा लागवडीसाठी टाकलेले रोपही खराब झाले .त्यानंतर दोन तीन वेळेस रोप टाकूनही वातावरणातील बदलामुळे तसेच दाट धुके ,व दवामुळे हे रोपे खराब झाल्याने तसेच नव्याने कांदा बियाणे उपलब्ध न झाल्याने या भागातील शेतकर्यांनी महागडी बियाणे,औषधे ,मजुरी,साठी खर्च करून भाजीपाला पिकांचे उत्पन्न घेतले मात्र या भाजीपाला पिकाला कमी दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग निराश झाला आहे. भाजीपाला बाजारात विक्र ीसाठी नेल्यास शेतकऱ्यांना वाहनाचा खर्चही घरातून करावा लागत असल्याने शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी झाली आहे.