जानोरीकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 08:59 PM2020-06-01T20:59:05+5:302020-06-02T00:41:30+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे एक शेतकरी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयातील व्यक्तींना पिंपरखेड येथील केंद्रात क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. कुटुंबातील या सदस्यांच्या घशाचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा काय अहवाल येतो, याकडे जानोरीकरांचे लक्ष लागून होते.
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे एक शेतकरी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयातील व्यक्तींना पिंपरखेड येथील केंद्रात क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. कुटुंबातील या सदस्यांच्या घशाचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा काय अहवाल येतो, याकडे जानोरीकरांचे लक्ष लागून होते. अखेर कुटुंबीयांतील सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना पुन्हा घरी सोडण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे एक शेतकरी कोरोनाबाधित आढळल्याने कोरोनामुक्त झालेला तालुका पुन्हा हादरला होता. सदर रुग्णाच्या कुटुंबात असलेल्या व्यक्तींना कोरोना अहवाल चाचणीसाठी पिंपरखेड येथील शासकीय कोरोना केंद्र येथे हलवण्यात आले होते. त्यांचा अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. सदर सर्व कुटुंबीयांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी दिली असता जानोरीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या कुटुंबाचे अहवाल निगेटिव्ह आल्याबरोबर त्यांना पुन्हा जानोरीत त्यांच्या घरी सोडण्यात आले. सदर कुटुंबीयांचे गावात आगमन होताच जानोरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. छगन लोणी, ग्रामविकास अधिकारी के.के. पवार, आरोग्यसेवक सुरेश भवर, विजय चौधरी, डॉ. नंदकुमार घोरपडे, गोरख तिडके, समीर शेटे, चेतन पाटेकर, श्यामराव खांबेकर, नीलेश विधाते आदी उपस्थित होते. सदर कुटुंबीयांना त्यांच्या घरापर्यंत नेऊन १४ दिवस घरातच थांबून पुरेपूर काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने इतरांनी घाबरून न जाता त्या कुटुंबीयांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.
--------------------------
मधुमेही रुग्णासह गर्भवती कोरोनामुक्त
सिन्नर : उपजिल्हा रु ग्णालयातून रविवारी (दि. ३१) दुपारी तीन जणांना घरी सोडण्यात आले. यात कणकोरी येथील १५ वर्षीय मुलगा, पांगरी येथील मधुमेह असलेला पुरु ष व गरोदर असलेली त्याची पत्नी यांचा समावेश आहे. सिन्नर ग्रामीण रु ग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिघांना निरोप दिला. येथील रु ग्णालयात २० बाधित उपचार घेत आहेत. यात नाशिकरोड, संगमनेर येथील प्रत्येकी एका रु ग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण बारा जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. यातील सात जण उपजिल्हा रु ग्णालयातील असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मला गायकवाड यांनी दिली.
-----------------------------------
तरीही लॉकडाउन राहणार!
कुटुंबीयांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी जानोरीतील लॉकडाउन मात्र कायम राहणार, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गावातील संपूर्ण कुटुंबाची माहिती घेतली जात असून, आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. सियॉन शाहूल, डॉ. संपदा गुरव, आरोग्यसेविका मंदा शिंदे, आरोग्यसेवक सुरेश भवर, विजय चौधरी, आशा गटप्रवर्तक रेखा बोस तसेच
सुनीता बोस, सोनाली केंग, जयश्री चौधरी, सुवर्णा बेंडकुळे, गंगा जाधव, कमल गाडर, मनीषा केंग आदी आशासेविका मेहनत घेत असून,
नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.