जनावरांची वाहतूक करणारा पिकअप जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:02 IST2018-12-10T00:02:19+5:302018-12-10T00:02:33+5:30
मालेगाव : कत्तलीसाठी अवैधरित्या पिकअप मधून जनावरांची वाहतूक करणाऱ्या एकास विशेष पोलीस पथकाने अटक केली. पाच जनावरे व वाहन असा पाच लाख ५६ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

जनावरांची वाहतूक करणारा पिकअप जप्त
ठळक मुद्दे वहाब लियाकत शेख (२४) यास पोलिसांनी अटक केली
मालेगाव : कत्तलीसाठी अवैधरित्या पिकअप मधून जनावरांची वाहतूक करणाऱ्या एकास विशेष पोलीस पथकाने अटक केली. पाच जनावरे व वाहन असा पाच लाख ५६ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
शहरातील मरीमाता चौकात अवैधरित्या कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती विशेष पोलीस पथकाला मिळाल्याने त्यांनी छापा टाकून पाच जनावरांची सुटका केली. वहाब लियाकत शेख (२४) यास पोलिसांनी अटक केली असून च्याविरुद्ध किल्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याचा साथीदार मोहंमद जुनैद फरार झाला. विशेष पोलीस पथकाचे उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, हवालदार ठोके, देवरे, माळी, भिलावे यांनी ही कारवाई केली.