अनिता बोडके यांचा सदस्यत्वाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:50 AM2018-11-18T01:50:29+5:302018-11-18T01:51:09+5:30

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीअंतर्गत निधीवाटपावरून असलेली खदखद टोकाला पोहोचली असून, समिती सदस्य धनश्री आहेर यांच्या पाठोपाठ अनिता बोडके यांनीही जलव्यवस्थापन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लेखाशीर्ष २७०२ अंतर्गत निधी नियोजनात भवाडा गटात निधी न दिल्याने बोडके यांनी आक्रमक भूमिका घेत अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याकडे शनिवारी (दि. १७) राजीनामा सुपूर्द केला

Anita Bodke's resignation | अनिता बोडके यांचा सदस्यत्वाचा राजीनामा

अनिता बोडके यांचा सदस्यत्वाचा राजीनामा

googlenewsNext
ठळक मुद्देजलव्यवस्थापन : निधी मिळत नसल्याने आक्रमक

नाशिक : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीअंतर्गत निधीवाटपावरून असलेली खदखद टोकाला पोहोचली असून, समिती सदस्य धनश्री आहेर यांच्या पाठोपाठ अनिता बोडके यांनीही जलव्यवस्थापन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लेखाशीर्ष २७०२ अंतर्गत निधी नियोजनात भवाडा गटात निधी न दिल्याने बोडके यांनी आक्रमक भूमिका घेत अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याकडे शनिवारी (दि. १७) राजीनामा सुपूर्द केला. यापूर्वी गेल्या महिनाभरापूर्वी धनश्री आहेर यांनी राजीनामा दिला होता. परंतु अध्यक्ष शीतल सांगळे यांनी त्यांचा राजनामा स्वीकारला नाही. त्यामुळे या बोडके यांच्या राजीनाम्याविषयी अध्यक्ष काय भूमिका घेणार याकडे जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांचे लक्ष लागले आहे.
जलव्यवस्थापन समितीच्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत नियोजन रखडल्याने आक्रमक झालेल्या सदस्यांचा पदाधिकाऱ्यांच्या विरोधातील उद्रेक धनश्री आहेर यांच्या रूपाने उफाळून आला होता. कामांच्या फायली अडविल्या जात असल्याच्या तक्रारी मांडत सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करीत नसल्याचे आहेर यांनी सांगत सभात्याग करून थेट जलव्यवस्थापन समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. आहेर यांच्यानंतर समिती सदस्य असलेल्या अनिता बोडके यांनीही समिती सदस्यपदाचा राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली असून, समितीतील मतभेद आता टोकाला पोहोचल्याचे दिसून येत आहे. आदिवासी भागातील सुरगाणा तालुक्यातील भवाडा गटात अध्यक्षांनी आतापर्यंत २७०२ लेखाशीर्षांतर्गत एकही काम दिलेले नाही. गेल्या वर्षी कामे मिळावे यासाठी पत्र देण्यात आले होते. यंदाही या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन सीमेंट बंधारा मिळावा, याकरिता पत्र दिले. तसेच, वारंवार कामे मंजुरीसाठी विनंतीही केली. मात्र, नियोजनात गटात निधी देण्यात आलेला नाही. समितीत काम करूनही गटासाठी निधी मिळत नसेल, तर त्या समितीत काम कशाला करायचे, असा सवाल उपस्थित करीत अनिता बोडके यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

Web Title: Anita Bodke's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.