भाविक, पर्यटकांसाठी अनकाई किल्ला बंद; सोमवारची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:15 PM2020-07-22T21:15:56+5:302020-07-23T01:00:37+5:30
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनकाई किल्ल्यावर भाविक व पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, अनकाई ग्रामपंचायतीनेही श्रावण महिन्यात अनकाई किल्ला व गावात दर सोमवारी भरणारी यात्रा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

सोमवार, दि. २० जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला असून, अनकाई किल्ला येथे अगस्ती मुनींच्या दर्शनासाठी व पर्यटनासाठी जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. श्रावणी सोमवारनिमित्त अनकाई गाव किल्ला येथे यात्रा भरत असते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने फौजदारी संहिता कलमप्रमाणे लॉकडाऊन जारी असून, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, यात्रा, उरूस, सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घातली आहे. त्या अनुषंगाने अनकाई किल्ल्यावर प्रवेशबंदी करण्यात आली.
भाविकांनी अनकाई किल्ला या ठिकाणी दर्शनासाठी येऊ नये. आपापल्या घरी धार्मिक विधी पार पाडावेत, असे आवाहन मनमाड विभागाचे पोलीस उपधीक्षक समीरसिंह साळवे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी केले आहे.