रजेवरील लष्करी जवान पोलिसांसोबत आॅन ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 12:08 AM2020-04-04T00:08:18+5:302020-04-04T00:20:27+5:30

एरवी महिना-दोन महिन्यांच्या सुटीवर आलेले लष्करी जवान सुटीचा काळ आपल्या कुटुंबियांसोबत व्यतीत करतात. मात्र, सिडकोतील एक लष्करी जवान आपल्या सुटीच्या कालावधीत स्वेच्छेने रोज बारा तास कर्फ्युत ड्युटी करून पोलिसांना हातभार लावत आहे. देशसेवेने भारावलेल्या अन परिस्थितीचे अचूक गांभीर्य ओळखलेल्या या युवकाने अन्य लष्करी जवानांसमोर आदर्श उभा केला आहे.

Ann Duty with the military personnel on leave | रजेवरील लष्करी जवान पोलिसांसोबत आॅन ड्युटी

रजेवरील लष्करी जवान पोलिसांसोबत आॅन ड्युटी

googlenewsNext
ठळक मुद्देअनोखी देशसेवा : कर्फ्यूत करतो जनजागरण

नाशिक : एरवी महिना-दोन महिन्यांच्या सुटीवर आलेले लष्करी जवान सुटीचा काळ आपल्या कुटुंबियांसोबत व्यतीत करतात. मात्र, सिडकोतील एक लष्करी जवान आपल्या सुटीच्या कालावधीत स्वेच्छेने रोज बारा तास कर्फ्युत ड्युटी करून पोलिसांना हातभार लावत आहे. देशसेवेने भारावलेल्या अन परिस्थितीचे अचूक गांभीर्य ओळखलेल्या या युवकाने अन्य लष्करी जवानांसमोर आदर्श उभा केला आहे.
कैलासनाथ हिरालाल कनोजिया. वय वर्षे २८. मूळ रहिवाशी वाराणसीचा. छत्तीसगड येथे इंडोतिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स या ४० बटालियनमध्ये तो कार्यरत आहे. १५ वर्षांपासून सिडकोतील भुजबळ फार्म परिसरात तो वास्तव्यास आहे. दि. २५ फेब्रुवारी रोजी तो महिनाभराच्या सुटीवर नाशिकला आला होता. सुटीचा कालावधी संपत असतानाच देशभरात कोरोनामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे कैलासनाथच्या सुटीतही वाढ झाली. संचारबंदीच्या काळात ह्यकोणीही घराबाहेर पडू नका, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळाह्ण असे शासन, प्रशासन ओरडून सांगत असताना जनता गांभीर्य ओळखत नव्हती. ते चित्र पाहून व्यथित झालेल्या कैलासनाथने अंबड पोलीस स्टेशनमधील मित्र संजय जाधव यांना मला पोलिसांसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. चौधरी यांच्याशी बोलून संमती मिळविली. कर्फ्यु जाहीर झाल्याच्या त्या दिवसापासून कैलासनाथ लष्करी वेशात अंबड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसोबत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंतची पेट्रोलिंगची ड्युटी करीत आहे.

कसलीही अपेक्षा न बाळगता केवळ देशसेवा म्हणून कर्तव्य बजावणाºया कैलासनाथचे पोलीस कर्मचाऱ्यांना अप्रूप वाटत आहे. पोलीस ड्युटी करताना त्यास समाधान मिळत असले तरी ती म्हणतो, ह्यसाहब, बॉर्डर पर काम करना और सिव्हिल पुलीस के साथ काम करना एक जैसा ही है। फरक सिर्फ इतना ही है, बॉर्डर पर रिस्क है, और यहॉ सीरदर्द ।
कोरोनाला रोखण्यासाठी सरकार व पोलीस पोटतिडकीने सांगत आहेत. पण लोक या महामारीला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. रस्ता किंवा मार्केटमध्ये गर्दी करीत आहेत. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहे. मी करीत असलेले काम हिसुद्धा देशसेवाच असून मला कुटुंबाचीही साथ मिळत आहे.
- कैलासनाथ कनोजिया, लष्करी जवान

 

Web Title: Ann Duty with the military personnel on leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.