अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त मॉस्कोत भरणार साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:47 PM2017-10-28T23:47:06+5:302017-10-29T00:13:29+5:30
सामान्य माणसाची उर्मी जागी व्हावी व त्यांनी समाजासाठी सक्रिय योगदान द्यावे यासाठी जीवन कार्य व्यतित करणाºया लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियातील मॉस्को येथे दि. १ व २ आॅगस्ट २०२० रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य सांस्कृ तिक संमेलन सातारा येथील क्रांती थिएटर्ससह विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
नाशिक : सामान्य माणसाची उर्मी जागी व्हावी व त्यांनी समाजासाठी सक्रिय योगदान द्यावे यासाठी जीवन कार्य व्यतित करणाºया लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियातील मॉस्को येथे दि. १ व २ आॅगस्ट २०२० रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य सांस्कृ तिक संमेलन सातारा येथील क्रांती थिएटर्ससह विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. नाशिक विभागीय कार्यकारिणीची निवडही करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे कार्याध्यक्ष अमर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. अण्णा भाऊ साठे यांनी शोषणविरोधी व समाजवादी विचारांचा स्वीकार करून लोककलेद्वारे मानवी जीवनामध्ये सांस्कृतिक जीवन फुलविताना समाज मनाचा समन्वय बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या साहित्याला व विचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठीच आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. या संमेलनासाठी उपस्थित राहू इच्छिणाºया समाजबांधवांनी स्वखर्चाने संमेलनाला उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले असून, संमेलनासाठी जवळपास तीन हजार साहित्य रसिक उपस्थित राहण्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे. साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य सांस्कृतिक संमेलनासाठी नाशिक विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, कार्यकारिणी अध्यक्षपदी उत्तम अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष भगवान अवघडे, कोषाध्यक्ष श्रीनिवास डोंगरे, सचिव शशीकांत गाडे, उत्तम, अहिरे, बाळासाहेब शिरसाठ, संपादक मंडळाचे प्रमुख कवी सुभाष पवार, विश्वास कांबळे, सुभाष पवार, डॉ. पितांबर जाधव, दिनकर लांडगे, रामराव पारधे, शांताराम पगारे, शाहीर विजय थोरात, गणेश जाधव, दिलीप साठे, अशोक साठे उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना सामाजिक कार्य व साहित्यासाठी भारतरत्न पुरस्कार व ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी संमेलनाच्या आयोजकांनी केली आहे. तसेच अण्णा भाऊंच्या सांगलीतील वाटेगाव येथील जन्मगावी राष्ट्रीय लोककला आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी, विद्यापीठांमध्ये साठे अध्यासन केंद्र सुरू करावे, अशा विविध मागण्या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.