अंनिसने जातपंचायत थांबवल्याचा केला दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:15 AM2021-03-05T04:15:25+5:302021-03-05T04:15:25+5:30

म्हसरुळ भागातील वैदुवाडी येथे ही बैठक बेालावण्यात आली होती. ही माहिती कळताच अंनिसच्या कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे निवेदन ...

Annis claimed to have stopped the Jat Panchayat | अंनिसने जातपंचायत थांबवल्याचा केला दावा

अंनिसने जातपंचायत थांबवल्याचा केला दावा

Next

म्हसरुळ भागातील वैदुवाडी येथे ही बैठक बेालावण्यात आली होती. ही माहिती कळताच अंनिसच्या कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले.कार्यकर्त्यानी म्हसरूळ पोलीस ठाणे गाठले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. आर. ढोकणे यांची भेट घेतली. पोलिसानी तात्काळ वैदु वाडी येथील म्हसोबा मंदिर परिसरात भेट दिली. त्यामुळे जात पंचायत भरल्याचे आढळलल्याने पोलिसांनी मुख्य पंच व इतर काही लोकांना पोलीस ठाण्यात आणले, असे अंनिसच्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या मोहिमेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे, ॲड समीर शिंदे, कोमल वर्दे, नितीन बागुल यांनी भाग घेतला.

दरम्यान, यासंदर्भात वरीष्ठ पोलीस निरीक्षक ढोकणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ती पंचायत होती किंवा नाही याबाबत जाब जबाब घेण्याचे काम सुरू आहे. चौकशी नंतरच कारवाई संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Annis claimed to have stopped the Jat Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.