नोटाबंदीची वर्षपूर्ती : राष्टÑवादीतर्फे विधिवत वर्षश्राद्ध कॉँग्रेसतर्फे त्र्यंबक तहसीलदारांना निवेदन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:37 PM2017-11-09T23:37:54+5:302017-11-10T00:03:15+5:30

भाजपा सरकारने देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी नोटाबंदी केल्याने नागरिकांचीच कोंडी केली. तर काळा पैसाही जेथे आहे तेथेच राहिला व देश भ्रष्टाचार मुक्तही झाला नाही. नोटाबंदी करून आज एक वर्ष पूर्ण झाले. कॉँग्रेसतर्फे हजार व पाचशेच्या नोटांच्या फोटोला हार घालून श्रद्धांजली अर्पण केली.

Anniversary of the anniversary: ​​Deshvrradra Dutta announces to Trimbak tehsildars | नोटाबंदीची वर्षपूर्ती : राष्टÑवादीतर्फे विधिवत वर्षश्राद्ध कॉँग्रेसतर्फे त्र्यंबक तहसीलदारांना निवेदन !

नोटाबंदीची वर्षपूर्ती : राष्टÑवादीतर्फे विधिवत वर्षश्राद्ध कॉँग्रेसतर्फे त्र्यंबक तहसीलदारांना निवेदन !

Next
ठळक मुद्देभारतीय अर्थव्यवस्था कोलमडलीनागरिकांचीच कोंडी नोटाबंदी करून वर्ष पूर्ण निवेदन देऊन शासनाचा निषेध

त्र्यंबकेश्वर : भाजपा सरकारने देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी नोटाबंदी केल्याने नागरिकांचीच कोंडी केली. तर काळा पैसाही जेथे आहे तेथेच राहिला व देश भ्रष्टाचार मुक्तही झाला नाही. नोटाबंदी करून आज एक वर्ष पूर्ण झाले. कॉँग्रेसतर्फे हजार व पाचशेच्या नोटांच्या फोटोला हार घालून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच काँग्रेसने या एक दिवसाला काळा दिन पाळला. या दिवसाचे स्मरण म्हणून आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित, काँग्रेसचे कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे आदींनी एक निवेदन देऊन शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या.
मागील वर्षी भाजपा सरकारने तडकाफडकी बंद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या, त्यामुळे देशभर असंतोष माजला होता. भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली आणि त्याचे परिणाम सर्वसामान्य जनता आजही भोगत आहे. आज नोटाबंदीची वर्षपूर्ती आहे. त्यासाठीच काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आदी विरोधी पक्षांनी या दिवसाचे काळा दिन म्हणूनच वर्षश्राद्ध घातले.
यावेळी आमदार निर्मला गावित यांनी नोटाबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह सर्वच समाजघटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याची टीका केली. यावेळी शहराध्यक्ष वामन बदादे, दिनेश पाटील, निवृत्ती महाले, यशवंत महाले, निबयुन शेख, रोहिदास बोडके, बाळू बोडके आदी उपस्थित होते. राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे पाचशे व हजार रुपयांच्या नोटांचे विधिवत पिंडदान पुरोहितांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज काण्णव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कैलास मोरे, भास्कर मेढे, बाळू बोडके, उल्हास तुंगार, वसंतराव भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रा.काँ.तर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन या निर्णयाचा निषेध नोंदविला.

Web Title: Anniversary of the anniversary: ​​Deshvrradra Dutta announces to Trimbak tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.