जनकल्याण रक्तपेढीचा वर्धापन दिन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:53 AM2018-08-19T00:53:54+5:302018-08-19T00:54:10+5:30
गत २९ वर्षांपासून ‘सेवा हाच ध्यास’यानुसार रक्तसंकलन करून रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या जनकल्याण रक्तपेढीचा वाटचाल अतिशय गौरवास्पद आहे़ रक्तसंकलनासाठी मदत करणाºया विविध संस्था, शिबिर संयोजक व रक्तदाते यांच्यामुळे हे शक्य झाले असून त्यासाठी रक्तपेढीने केलेली रक्तदानाविषयी जनजागृती, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी केलेले प्रयत्नही तितकेच महत्वाचे आहेत़ रक्तपेढीने आपला हा रक्तदानाचा यज्ञ असाच अविरतपणे सुरू ठेवावा, असे प्रतिपादन औरंगाबादच्या डॉ़बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे डॉ़ अनंत पंढरे यांनी केले़
नाशिक : गत २९ वर्षांपासून ‘सेवा हाच ध्यास’यानुसार रक्तसंकलन करून रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या जनकल्याण रक्तपेढीचा वाटचाल अतिशय गौरवास्पद आहे़ रक्तसंकलनासाठी मदत करणाºया विविध संस्था, शिबिर संयोजक व रक्तदाते यांच्यामुळे हे शक्य झाले असून त्यासाठी रक्तपेढीने केलेली रक्तदानाविषयी जनजागृती, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी केलेले प्रयत्नही तितकेच महत्वाचे आहेत़ रक्तपेढीने आपला हा रक्तदानाचा यज्ञ असाच अविरतपणे सुरू ठेवावा, असे प्रतिपादन औरंगाबादच्या डॉ़बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे डॉ़ अनंत पंढरे यांनी केले़
जनकल्याण रक्तपेढीचा २९ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी शंकराचार्य संकुल येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पंंढरे बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, रक्तदानामुळे कुणाचा तरी प्राण वाचतो ही संकल्पना आता जनमानसात चांगलीच रुजली आहे़ रक्तपेढीने संकलीत केलेल्या अकरा हजार रक्तपिशव्या हा नागरिकांनी दाखविलेला विश्वास आहे़