निफाडच्या प्रयत्न विचार मंचचा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 04:57 PM2019-01-07T16:57:40+5:302019-01-07T16:58:09+5:30

निफाड : येथील प्रयत्न विचार मंच या सामाजिक संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथील दीपस्तंभ फाउन्डेशनचे प्रा. यजुर्वेन्द्र महाजन यांचे ‘उत्तुंग भरारी घेऊया’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

 Anniversary of Forum of Opinion Forum | निफाडच्या प्रयत्न विचार मंचचा वर्धापनदिन

 निफाड येथील प्रयत्न विचार मंच सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना यजुर्वेन्द्र महाजन.

googlenewsNext
ठळक मुद्देमाशाला उडायला सांगितले तर उडता येणार नाही. पक्षाला पोहायला सांगितले तर पोहता येणार नाही याच तत्त्वाने पालकांनीसुद्धा आपल्या पाल्यांमधील सुप्त गुण आणि त्याची कुवत ओळखून त्याला जे आवडेल, जे जमेल त्याच्यात प्रावीन्य मिळविण्याची संधी द्यावी. स्वत:च्या अपेक्षा

निफाड : येथील प्रयत्न विचार मंच या सामाजिक संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथील दीपस्तंभ फाउन्डेशनचे प्रा. यजुर्वेन्द्र महाजन यांचे ‘उत्तुंग भरारी घेऊया’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
प्रारंभी प्रा. यजुर्वेन्द्र महाजन, राजेंद्र सोमवंशी, सुनील जाधव, संजय आहेर, सुहास सुरळीकर यांच्या हस्ते माता जिजाऊ, क्र ांतिज्याती सावित्रीबाई फुले, राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कुंडीतील रोपट्यास पाणी घालून दीपप्रज्वलन करण्यात आले.


महाजन यांनी प्रशासकीय अधिकारी घडविणाऱ्या दीपस्तंभ फाउन्डेशनच्या कार्याची माहिती दिली.
आजकाल सर्वांनाच मोबाइल हवाहवासा आणि अत्यावश्यक वाटतो. विद्यार्थ्यांनी दिवसातून फक्त १५मिनिटं आणि ३ वेळाच मोबाइल वापरला तरी गरजेपुरती आवश्यक ती माहिती मिळू शकते. अन्यथा मोबाइलच्या अतिवापराने पुढील पिढी बिघडण्याची भीती असते, असे महाजन म्हणाले. महापुरु षांची पुस्तके वाचा, त्यांच्या विचारांचे अनुकरण करा, आईवडील व गुरु जनांचा आदर करा, रोज किमान अर्धा तास व्यायाम करा असे केल्याने पाच वर्षे आयुष्य वाढेल, असा सल्लाही त्यांनी दिला. तुम्हाला जे करायचे ते सर्वोत्तम, बेस्ट करा जीवनात नकीच यशस्वी व्हाल, असा कानमंत्र त्यांनी दिला.
या प्रसंगी वि. दा. व्यवहारे, राजेंद्र राठी, अनिल कुंदे, जावेद शेख, देवदत्त कापसे, ना.भा. ठाकरे, मधुकर व्यवहारे, विक्र म रंधवे, सोमनाथ आंधळे, सुनील राठोर, अभिजित चोरडिया, भारती कापसे आदींसह बाळासाहेब कापसे, सुनील चिखले, महेश बनकर, प्रवीण ढेपले, चंद्रभान जाधव, बा. बा. गुंजाळ, प्रकाश परदेशी, विजय डेर्ले, दत्तू बागडे, संजय श्रीवास्तव, भारत बैरागी, नाथाभाऊ खरात, खैरे तात्या, किसन चौधरी, श्रीकांत रायते, तन्वीर राजे, राजाराम धारराव, विनोद बनकर उपस्थित होते.
प्रास्तविक शिवाजी ढेपले यांनी केले. कवी राजेंद्र सोमवंशी यांनी अतिथींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. संजय आहेर यांनी आभार मानले.
 

Web Title:  Anniversary of Forum of Opinion Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.