राजपत्रित अधिकाºयांच्या नाशिक समितीचा सत्कार वर्धापनदिन : मुख्यमंत्र्यांनी काढले गौरवोद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:41 AM2018-02-10T00:41:48+5:302018-02-10T00:42:15+5:30
नाशिक : महाराष्टÑ राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकच्या राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीच्या अधिकाºयांचा सत्कार करण्यात आला.
नाशिक : महाराष्टÑ राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकच्या राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीच्या अधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. राज्यात नाशिक जिल्हा समन्वय समिती सर्वांत आघाडीवर असल्याचे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. मुंबईत शासकीय कामकाजासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या अधिकाºयांना वारंवार जावे लागते अशा वेळी या अधिकाºयांना कधी कधी मुक्कामदेखील करावा लागतो. परंतु मुंबईत राहण्याची सोय नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने राज्य सरकारने राजपत्रित अधिकारी महासंघाला विश्रांतीगृह बांधण्यासाठी ब्रांदा येथे भूखंड दिला आहे. या भूखंडावर काम सुरू करण्यासाठी अधिकाºयांकडून वर्गणी गोळा केली जात असून, नाशिक जिल्ह्यातून पंधरा लाख रुपये गोळा करण्याचे दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करून सोळा लाख रुपये गोळा करण्यात आले. महासंघाच्या वर्धापनदिन सोहळ्यात हा निधी सुपुर्द करण्यात आला. निधी गोळा करण्याच्या कामी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, प्रमोद वानखेडकर, संजय पोखरकर, अविनाश पाटील, राजेंद्र खैरनार, अजय लिटे, डॉ. किरण मोघे, अनिता खैरनार आदींनी योगदान दिले.