पांगरी खुर्द येथे हनुमान मंदिराचा वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:48 AM2018-04-07T00:48:35+5:302018-04-07T00:48:35+5:30
सिन्नर : तालुक्यातील पांगरी खुर्द येथील हनुमान मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारपासून (दि. ७) अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सिन्नर : तालुक्यातील पांगरी खुर्द येथील हनुमान मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारपासून (दि. ७) अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांच्या प्रेरणेने व किशोर महाराज खरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनिक कार्यक्रमात पहाटे ४ वाजता काकडा भजन, सकाळी ६ वाजता रामरक्षा सहस्त्रनाम, सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरी वाचन आदी कार्यक्रम होणार आहेत. सप्ताह काळात भगीरथ महाराज काळे, उमेश महाराज दशरथे, उद्धव महाराज मंडलिक, विश्वनाथ महाराज वारिंगे, जगन्नाथ महाराज पाटील, किशोर महाराज खरात, नंदकिशोर महाराज खरात यांची कीर्तने होणार आहेत. शनिवारी (दि. १४) निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) याचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती व पांगरी खुर्दच्या ग्रामस्थांनी केले आहे.