पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचचा वर्धापनदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:17 AM2019-03-28T00:17:25+5:302019-03-28T00:18:09+5:30
नाशिककरांसाठी मुंबईला दररोज धावणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचचा बारावा वर्धापनदिन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.
नाशिकरोड : नाशिककरांसाठी मुंबईला दररोज धावणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचचा बारावा वर्धापनदिन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.
इंटरसिटचा दर्जा असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचच्या (कोच सी-3) बाराव्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी नाशिक ते इगतपुरी दरम्यान रेल परिषदेचे अध्यक्ष गुरुमितसिंग रावल, जयराम दियालानी, पंढरीनाथ घुगे, अशोक रूपवते, अमोल घाटगे, डॉ. सुहानंद सोनार, तुषार भवर, गोविंद वागे, आरती माळी, विनार गणवीरे, पवन दोडामणी, दत्ता दळवी, प्रज्ञा चंद्रमोरे, उत्तम टाकळकर, विनायक पगारे, कोमल भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. घुगे आणि रावल यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तर सायंकाळी दादर ते कल्याण दरम्यान प्रवाशांनी आदर्श कोचचा वर्धापनदिन साजरा केला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वर्धापनदिन कार्यक्रमात प्रवासी सहभागी झाले होते.
लिम्का बुकमध्ये कोचची नोंद
रेल परिषदेचे दिवंगत अध्यक्ष बिपीन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली या कोचची निर्मिती व नियम करण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान जपलेली मूल्ये, शिस्त, स्वच्छता आदींमुळे या कोचची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आहे. गांधी यांच्या निधनानंतर हा कोच आदर्श ठेवण्याचे कार्य रेल परिषद एनएक्स या नावाने प्रवासी करीत आहेत.