मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 06:39 PM2019-05-05T18:39:51+5:302019-05-05T18:40:20+5:30

मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून मोहन किर्तने , वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, प्रदिप गुजराथी, किशोर नावरकर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

Anniversary of Manmad Public Library | मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा वर्धापनदिन

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिन प्रसंगी उपस्थित अध्यक्ष नितीन पांडे, मोहन किर्तने, प्रदिप गुजराथी, कल्पेश बेदमुथा, किशोर नावरकर आदी.

Next

मनमाड: मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून मोहन किर्तने , वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, प्रदिप गुजराथी, किशोर नावरकर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कल्पेश बेदमुथा यांनी केले. यंदा वर्धापन दिनाचे औचित्य साधुन वाचनालयाच्या वाचकांसाठी ४४६ नवीन पुस्तके वाचकांना वितरणासाठी खुली करण्यात आली. या ग्रंथसंपदेमध्ये कथा, कथासंग्रह, कादंबरी, कवीता, ललितसाहित्य, नाटक, महिला विषयी कायदे, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, पर्यावरण, वास्तुशास्त्र, ज्योतीष्य, धार्मिक, व्यावसायिक, व्यापार विषयक आरोग्य विषयक, शैक्षणिक, स्पर्धा परिक्षा विषयक, संदर्भ ग्रंथ , बाल व किशोर वाड्मय, अनुवादित पुस्तके आदी विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे.सध्या सुरु असलेल्या सुट्टीच्या काळात शालेय विद्यार्थ्यांकरीता वाचनालयामध्ये बाल वाचकांकरीता मोफत बाल वाचनालय १५ जूनपर्यंत सुरु राहणार असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगीतले. या वेळी प्रकाश गाडगीळ , किशोर गुजराथी, जय फुलवाणी, नरेंद्र किर्तने, मनोज जंगम, देवेंद्र गवांदे, कांतीलाल लुणावत, निळकंठ त्रिभूवन, सचिन छाजेड, विनोद शर्मा, संध्या गुजराथी, हेमंत मटकर, नंदिनी फुलभाटी आदी उपस्थित होते.

Web Title: Anniversary of Manmad Public Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.