येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 00:16 IST2021-06-11T00:02:20+5:302021-06-13T00:16:42+5:30
येवला : येथील पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचा २२वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन
येवला : येथील पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचा २२वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
पक्षाचे ध्वजारोहण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रांतिक सदस्य अरुण थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास साहेबराव मढवई, संजय बनकर, मोहन शेलार, वसंत पवार, दीपक लोणारी, हुसेन शेख, विजय गोखले, संजय सोमासे, भूषण लाघवें, समीना शेख, मुश्रीफ शहा, शंकर मांजरे, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, सचिन सोनवणे, प्रवीण बनकर, अविनाश कुक्कर, नितीन आहेर, प्रवीण पहिलवान, विशाल परदेशी, संतोष जेजुरकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.