दत्त मंदिराचा वर्धापनदिन; बक्षीस वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:37 AM2018-12-23T00:37:33+5:302018-12-23T00:38:12+5:30

नाशिक तालुक्यातील गिरणारे गावातील एकमुखी दत्त मंदिरात वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 Anniversary of the temple of Dutt; Reward distribution ceremony | दत्त मंदिराचा वर्धापनदिन; बक्षीस वितरण सोहळा

दत्त मंदिराचा वर्धापनदिन; बक्षीस वितरण सोहळा

googlenewsNext

गंगापूर : नाशिक तालुक्यातील गिरणारे गावातील एकमुखी दत्त मंदिरात वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  महानुभाव श्री दत्त मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थ गिरणारे समस्त कोठी परिवार आणि हिताक्षा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीकृष्ण चरित्र लेखी परीक्षा घेऊन बक्षीस वितरण, वर्धापनदिन, जयंती महोत्सव अशा त्रिसूत्री कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेपाचपासून कार्यक्र मांची सुरु वात देवास मंगल स्नानाने करण्यात आली. त्यानंतर श्री दत्त कवच पाठ, ध्वजारोहण, श्रीकृष्ण चरित्र लेखी परीक्षा आणि बक्षीस वितरण, धर्मसभा, आरती, पंचावतार उपहार आणि महाप्रसादाचा कार्यक्र म होऊन सांगता झाली. याप्रसंगी केशराजदादा भोजने, श्रीधरदादा सुकेणेकर, श्यामसुंदर कोठी, विश्वनाथदादा कोठी, आमदार योगेश घोलप, जी. प. सदस्य हिरामण खोसकर, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर, गिरणारेचे सरपंच अलका दिवे, पुंडलिकराव थेटे, राष्ट्रवादीचे दीपक वाघ, वामन खोसकर, हरिभाऊ गायकर, निशिकांत पगारे, दत्तू थेटे, नारायण उगले, राजू लभडे, चंद्रकांत खोसकर, योगेश तिदमे, अमोल थेटे, कृष्णा गायकर, दीपक थेटे, गणपत नवले, योगेश थेटे, सुनील थेटे, भीमा करवंदे आदि उपस्थित होते.  यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष महंत सुकेणेकरबाबा शास्त्री, महंत चक्र पाणीबाबा यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी अनेक सामाजिक संस्थांचे सत्कार करून गौरविण्यात आले.

Web Title:  Anniversary of the temple of Dutt; Reward distribution ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.