आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा वर्धापन दिन होणार साधेपणाने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 07:09 PM2020-06-09T19:09:01+5:302020-06-09T19:10:55+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 22 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. विद्याापीठ प्रशासनाकडून दरवर्षी दिमाखदार सोहळ्यात वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने विशेष खबरदारी घेत साधपणाने वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बुधवारी (दि. १०) २२ वा वर्धापन दिन आहे. परंतु, कोविड-१९ साथरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कुलगुरू व अधिकारी यांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रा राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्यालयात कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते बुधवारी (दि.१०) ध्वजवंदन होणार असून त्यानंतर विद्यापीठ गीत होणार आहे. विद्यापीठ प्रांगणात आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमास विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर व अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे. विद्यापीठ गीताकरीता उपस्थित विद्यापीठातील अन्य कर्मचाºयांनी त्यांच्या विभागात थांबावे असे निर्देशित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर सकाळी ११ वाजता सर्व संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, अभ्यागत यांना विद्यापीठातर्फे वर्धापन दिनानिमित्त आॅनलाईन पध्दतीने संबोधित करणार आहे.