मुंबईतील महिलेचे झूम अ‍ॅपद्वारे वर्षश्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:09 PM2020-05-10T22:09:06+5:302020-05-10T22:10:12+5:30

लासलगाव : दोनशे नातेवाइकांनी घेतला सहभागलासलगाव : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अन्य जिल्ह्यांत प्रवास करण्यास बंदी असल्याने मुंबई येथील गुलाब बिडवे या महिलेचे वर्षश्राद्ध झूम अ‍ॅपच्या साहाय्याने त्यांचा मुलगा संतोष बिडवे यांनी या अ‍ॅपवर गुरुजींनी आॅनलाइन पूजा सांगत विधी पार पाडले.

Anniversary of a woman from Mumbai through the Zoom app | मुंबईतील महिलेचे झूम अ‍ॅपद्वारे वर्षश्राद्ध

मुंबईतील महिलेचे झूम अ‍ॅपद्वारे वर्षश्राद्ध

Next
ठळक मुद्देझूमवर मोबाइल तसेच लॅपटॉपवर पाहिला व सहभागी होत प्रथमच हा अनुभव घेतला.

लासलगाव : दोनशे नातेवाइकांनी घेतला सहभागलासलगाव : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अन्य जिल्ह्यांत प्रवास करण्यास बंदी असल्याने मुंबई येथील गुलाब बिडवे या महिलेचे वर्षश्राद्ध झूम अ‍ॅपच्या साहाय्याने त्यांचा मुलगा संतोष बिडवे यांनी या अ‍ॅपवर गुरुजींनी आॅनलाइन पूजा सांगत विधी पार पाडले. मुंबईतील हा वर्षश्राद्धाचा कार्यक्र म आॅनलाइनने नाशिकसह पुणे तसेच परराज्यात चेन्नई येथील नातेवाइकांना घरी बसून अनुभवता आला.
मुंबई मंत्रालयाच्या परिवहन विभागाचे स्वीय सहायक संतोष बिडवे यांच्या आईचा चेंबूर येथे प्रथम वर्षश्राद्धाचा कार्यक्रम चेंबूर येथील निवासस्थानी रविवारी (दि.१०) सकाळी साडेदहा वाजता अ‍ॅपवर सुरू झाला. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिक, विरार, पुणे, अंबिवली यांसह ठिकठिकाणी सुमारे दोनशे नातेवाइकांना घरी बसून हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झूमवर मोबाइल तसेच लॅपटॉपवर पाहिला व सहभागी होत प्रथमच हा अनुभव घेतला.

Web Title: Anniversary of a woman from Mumbai through the Zoom app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.